सामान्य जनता आणि विद्यार्थी यांच्यात विज्ञा्नाविषय़ी कुतूहल निर्माण करणारी महाराष्ट्रात काही विज्ञान केंद्रे आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांच्यापैकी काही ही :-

सायन्स सेंटर, ठाणे

संपादन

मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरच्या धर्तीवर ठाण्यात एक सायन्स सेंटर उभारले गेले आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने (एनसीएसएम) मंजूरी नंतर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली या सेंटर उभारणीची झाली. हे सेंटर, ठाणे आणि सभोवतालच्या शहरातील शाळकरी मुलांचे कुतूहल शमविण्याबरोबर त्यांच्या ज्ञानात भर टाकणारे असून ठाणे शहराच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक चळवळीतला महत्त्वाचा टप्पा आहे.[]

सायन्स सेंटरमध्ये अंतराळ विज्ञान, कम्प्युटर्स आदी विविध विज्ञान शाखांची सखोल माहिती देणाऱ्या दालनांसोबतच ५० बदलत्या प्रदर्शनाची सोय असलेली विज्ञान वाटिका प्रस्तावित आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेने नुकताच या केंद्राला हिरवा कंदील दाखवला. अंतराळ विज्ञान, सूर्यमालिका तसेच सौर, अणु, पारंपरिक ऊर्जेचा अभ्यास, पूरविज्ञान, चक्रीवादळ, ओझोनचा ऱ्हास, पृथ्वीचे तापमान, पृथ्वीचे संरक्षण, तसेच संगणक शास्त्राची सखोल माहिती, २५ जणांची आसनक्षमता असलेले तारकामंडळ, ५० बदलत्या प्रदर्शनाचा समावेश असलेली विज्ञान वाटिका, जगभरातील वैज्ञानिक संस्थांची माहिती, भारतीय वैज्ञानिकांचा कार्यपरिचय असा प्रचंड माहितीचा खजिना या सायन्स सेंटरमध्ये असेल. दुसऱ्या टप्प्यात थ्रीडी डोम थिएटर, नोबेल म्युझियम, फिरते विज्ञान प्रदर्शन यांसारख्या योजनाही सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.[ संदर्भ हवा ]

बाळकुम येथील पिरॅमल इंडस्ट्रीजकडून मिळणाऱ्या ३२ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर हे सायन्स सेंटर आहे.[ संदर्भ हवा ]

रीजनल सायन्स सेंटर, पिंपरी

संपादन

महाराष्ट्रात चिंचवड येथे ’ऑटो क्लस्ट”समोर एक रीजनल सायन्स सेंटर आहे. हे सेंटर स्थापन करण्यासाठी एनसीएसएमने काही निकष ठरवून दिले होते. त्यांची पूर्तता करून शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सेंटरसाठी मंजूरी मिळवली. हे सेंटर सध्या चार हेक्टर जागेवर उभे आहे. भविष्यात आणखी १० हेक्टर जागा इथे उपलब्ध होणार आहे.[]

आकाशमित्र संस्था, कल्याण

संपादन

तारे, ग्रह, नक्षत्र, दीर्घिका, तेजोमेघ, आकाशगंगा, धुमकेतू अशा अवकाशातील भव्य विश्वाविषयी शास्त्रीय पद्धतीने व्यापक माहिती देण्याचे कार्य कल्याणातील आकाश मित्र मंडळ गेल्या इसवी सन १९८६पासून करते आहे. आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम, व्याख्याने, खगोलशास्त्राचा प्राथमिक अभ्यासक्रम, सौर कॅलेण्डरचा प्रसार, तसेच ग्रह, चंद्र, तेजोमेघ इत्यादींची फोटोग्राफी केली जाते. ॲस्ट्रोनॉमी ऑलिम्पियाड असे असंख्य उपक्रम या संस्थेतर्फे सातत्याने घेतले जातात. 'आकाशमित्र'तर्फे एमकेसीएलच्या era.mkcl.org/oer वेबसाइटवर खगोलशास्त्राची संकल्पना स्पष्ट करणारा १२ भागांचा इंटरॅक्टिव्ह बेसिक कोर्स मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]

केवळ शालेय विद्यार्थ्यांपुरता खगोलशास्त्राचा अभ्यास मर्यादीत न ठेवता, 'आकाशमित्र'तर्फे सर्वांसाठी खगोलशास्त्राचा १२ रविवारचा अभ्यासक्रम घेतला जातो. तो पूर्ण झाल्यावर मामनोली येथे संस्थेतर्फे प्रत्यक्ष आकाशदर्शनाचा कार्यक्रम केला जातो.[ संदर्भ हवा ]

सौर कॅलेंडर ही भारताची राष्ट्रीय ओळख असली तरी तिचा वापर फारसा होत नाही. त्यामुळे या कॅलेंडडरचा प्रसार करण्याचे कार्यही संस्था आणि तिचे एक प्रमुख सदस्य हेमंत मोने करतात.. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पार्ले येथील ग्राहक पंचायत, चतुरंगची संदर्भ डायरी यांमध्ये सौर कॅलेंडरचा समावेश झाला आहे. अगदी चेकवरदेखील सौर दिनांकाचा उल्लेख केला तरी बँकेला तो चेक स्वीकारावा लागतो, ही बहुतांश जणांना माहिती नसलेली वस्तुस्थिती या संस्थेमार्फत उजेडात आणली जाते.[ संदर्भ हवा ]

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी देशभरातून सुमारे ४० ते ५० विद्यार्थी निवडले जातात. होमी भाभा शिक्षण केंद्रात त्यांच्यासाठी होणाऱ्या खगोलशास्त्रावरील शिबिरात मोने यांच्या व्याख्यानाचा समावेश असतो. मुंबई विद्यापीठाचा खगोलशास्त्रावरच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात अभय पुराणिक, शिशिर देशमुख आणि हेमंत मोने हे आकाशमित्र अनेक वर्षांपासून व्याख्यानं देत आहेत. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप या संस्थेतर्फे दरवर्षी विज्ञान दिनानिमित्त होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनात आकाशमित्र संस्थेचा स्टॉल असतो. या उपक्रमातून अधिकाधिक जणांपर्यंत विज्ञानाची माहिती पोहोचावी, यादृष्टीने संस्थेचे प्रभाकर गोखले पुढाकार घेतात. शिशिर देशमुख आणि हेमंत मोने यांनी ॲस्ट्रॉनॉमी ऑफ एक्लिप्स या पुस्तकाचे लिखाणदेखील केले आहे.[ संदर्भ हवा ]

सायन्स असोसिएशने

संपादन

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विज्ञानाची माहिती कॉलेजांमध्ये सायन्स असोसिएशनच्या माध्यमातून दिली जाते. या असोसिएशनतर्फे तज्ज्ञ शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्र, डिबेट, प्रोजेक्ट, निबंध, पोस्टर स्पर्धा, पॉवर पॉइण्ट प्रेझेंटेशन आदी विविध उपक्रम राबवले जातात. कल्याणातील बिर्ला कॉलेजात जी. डी. यादव आणि डॉ. राजेश वत्स आदी आघाडीच्या शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कॉलेजांना भेटी देतात.[ संदर्भ हवा ]

याखेरीज टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, नेहरू तारांगणला भेटदेखील असोसिएशनतर्फे आयोजित केली जाते. स्टार प्रवाह हा विज्ञानावर आधारित फेस्टिव्हल, प्रयोगातून विज्ञान, फन विथ सायन्स, इको फ्रेंडली कॅम्पस आणि विज्ञानातील संकल्पनेवर आधारित रांगोळी अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांची विज्ञानातील गोडी वाढवण्याचा प्रयत्न ही चळवळ करते. दरवर्षी कॉलेजमध्ये इको फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शनदेखील भरवले जाते.[ संदर्भ हवा ]

मराठी विज्ञान परिषद

संपादन

विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या मराठी विज्ञान परिषदेकडून भरीव कार्य करण्यात आले आहे. विज्ञानाचे जीवनातले महत्त्व वाढावे आणि सर्वसामान्यांमधील वैज्ञानिक साक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यावर या विभागाचा भर असतो. त्यासाठी संस्थेतर्फे विविध उपक्रम केले जातात. दरवर्षी फेब्रुवारी- मार्च महिन्यात विज्ञान व्याख्यानमाला तसेच आरोग्य विज्ञान व्याख्यानमाला आयोजित करून लोकांमधील शंकांचे निसरन केले जाते. मध्यवर्ती संस्थेच्या धोरणानुसार, शास्त्रज्ञांशी मुक्त संवाद साधण्याची संधी देऊन मोलाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली जाते.. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी तालुका स्तरावरही विज्ञान संमेलन आयोजित केले जाते. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, दीपक फाटक, प्रभाकर देवधर आदी आघाडीच्या शास्त्रज्ञांनी या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ वस्तूंपासून खेळणी तयार करण्याच्या कार्यशाळा ठाणे, कल्याण आदी ठिकाणी संस्थेतर्फे घेण्यात येतात. ‌विज्ञान सहलींमध्ये लोणार सरोवर, चोंडा येथील वीज प्रकल्पांना भेटी, विविध स्थळांवरून आकाशदर्शन शालेय विद्यार्थ्यांना घडवले जाते. खगोलशास्त्रावर आधारित प्रदर्शन भरवताना केवळ त्या शाळेपुरते मर्यादीत न राहता आजूबाजूच्या परिसरात किमान ८ ते १० शाळांमधील विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होऊ शकतील, अशा शाळेची निवड प्रदर्शनासाठी केली जाते. सन २००९ हे वर्ष आंतरराष्ट्रीय खगोल वर्ष म्हणून साजरे झाले होते. त्यानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जयंत नारळीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याच वर्षी खगोल संमेलनात इस्त्रो, आयुका, टीआयएफआर, आयआयटी या आघाडीच्या संस्थांमधील तज्ज्ञ सहभागी झाले होते. तसेच खास प्रदर्शनात इस्त्रोतर्फे प्रदर्शन मांडण्यात आले होते. परिषदेतर्फेही स्वतंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला ३५ ते ४० हजार विद्यार्थी व नागरिकांनी प्रतिसाद दिला होता.[ संदर्भ हवा ]

मुलांना विज्ञानाची गोडी लागण्यासाठी अनेक शाळा-कॉलेजे प्रयत्‍न करीत असतात. डोंबिवलीतील स. गो. बर्वे क्लासेस, चैतन्य वझे यांच्याद्वारे होमी भाभा परीक्षेसाठी उत्तम मार्गदर्शन करण्यात येते, विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे प्रात्याक्षिक ज्ञान दिले जाते. यामुळेच होमीभाभा मधील गोल्ड मेडलिस्ट डोंबिवली शहरात पुढे येताना दिसत आहेत. डोंबिवलीतील जोशी हायस्कूल, टिळकनगर विद्यामंदिर, चंद्रकांत पाटकर विद्यामंदिर या शाळा वेगवेगळे प्रयोग लोकांसमोर घेऊन येत आहेत. जोशी हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते.[ संदर्भ हवा ]

डोंबिवलीतील पेंढरकर कॉलेज

संपादन

कॉलेज तरुणांची विज्ञानाची आवड जोपासण्यात डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या पेंढरकर कॉलेजचे मोठे योगदान आहे. कॉलेजातील नॅनो विज्ञान संशोधन केंद्रातील सुसज्ज प्रयोगशाळेचे उद्‌घाटन अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाने मेक्सिकोतील तबास्को येथील जुआरेज स्वायत्त विद्यापीठाशीही सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि नॅनो तंत्रज्ञान या तीन विषयांत परस्परांना सहकार्य करणार आहेत. यामुळे शिक्षणपद्धतीतील देवाणघेवाण करणे शक्य होणार असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. जुआरेज स्वायत्त विद्यापीठाचे डॉ. होसे मॅन्युल पिनिया गुटिअरेज व महाविद्यालयाच्या प्राचार्या रानडे यांनी हा करार केला. सायन्स शाखेतील अनेक पदव्युत्तर विद्यार्थी आणि शिक्षकांना याचा फायदा होत आहे. या प्रयोगशाळेत सुपर कपॅसिटर्स, सौरऊर्जेसाठी लागणारे सेल्स, पाणी शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान, हायड्रोन साठवण्यासाठीचे तंत्रज्ञान यांविषयी संशोधन केले जाते. या संशोधनासाठी कार्बन व धातूंचे नॅनो कण यांचा वापर केला जातो.[ संदर्भ हवा ]

याशिवाय विज्ञान शाखेसंदर्भात इतरही उपक्रम पेंढरकर कॉलेजद्वारे राबवले जातात. कॉलेजच्या सर्वच सुसज्ज प्रयोगशाळा आणि सुविधांमुळे संशोधनाकडे विद्यार्थी वळत आहेत. विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींचे विचार ऐकायला मिळावेत आणि त्यांच्या संशोधनाबद्दल माहिती मिळावी यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन कॉलेजतर्फे करण्यात येते. मध्यंतरी कॉलेजमध्ये nanomaterials for sustainable greentechnology या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वेगवेगळ्या देशांतील प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी हजेरी लावली होती. कॉलेजद्वारे नेहमीच संशोधनाला प्राधान्य दिले जाते. कॉलेजमधील सर्वच शिक्षक कल्पक आणि विज्ञानाविषयी आस्था असलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा फायदा होतो.[ संदर्भ हवा ]



(अपूर्ण)

संदर्भ

संपादन
  1. ^ "ठाण्यात सायन्स सेंटर". Maharashtra Times.
  2. ^ Mar 16, Siddharth Gaikwad. "Regional science centre to come up at Chinchwad | Pune News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 25 मे 2020 रोजी पाहिले. Text " TNN " ignored (सहाय्य)