विज्ञानदिन
फेब्रुवारी २८ हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात येतो. विज्ञानप्रसारविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. वैज्ञानिक दृष्टिकोन शोधक वृत्ती मानवतावाद आणि सुधारणा यांना प्रोत्साहन देणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे या घटनेतील कर्तव्याची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अनिष्ट परंपरांचा पगडा उतरवून निर्भयपणे विज्ञानवाद स्वीकारावा असे आवाहन यात केले जाते.