विजयालक्ष्मी रविंद्रनाथ

विजयालक्ष्मी रविंद्रनाथ (१८ ऑक्टोबर, १९५३:चेन्नई, तमिळ नाडू, भारत - ) या भारतीय न्यूरोवैज्ञानिक[मराठी शब्द सुचवा] आहेत. त्यांनी अल्झायमर्स डिसीझ आणि पार्किन्सन्स डिसीझ या रोगांवर संशोधन केले आहे. या बंगळूरच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये प्राध्यापिका असून नॅशनल ब्रेन रीसर्च सेंटर या संस्थेच्या संस्थापिका आहेत.

विजयालक्ष्मी यांनी आंध्र विद्यापीठातून बी.एससी. आणि एम.एससी. तर मैसूर विद्यापीठातून पीएच.डी. पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन केले.

त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळालेले आहेत.