विकिपीडिया बोधचिन्ह

विकिपीडियाचे बोधचिह्न ही विकीपिडिया व्यासपीठाची जागतिक ओळख आहे. पृथ्वीच्या गोलाच्या संकल्पनेवर आधारित आहे.जिगसाॅ पझल या खेळामधे असलेले तुकडे जोडण्यासारखी संकल्पना या चिह्नात आहे.बोधचिह्नात वरच्या बाजूला ही तुकड्यांची जोडणी अपूर्ण दाखविली आहे.विकिपीडिया असा इंग्रजी कॅपिटल अक्षरात लिहिलेला शब्द या पृथ्वीच्या गोलाच्या खाली नोदविलेला आहे.त्याखाली फ्री एनसायक्लोपिडिया म्हणजे मुक्त ज्ञानकोश असेही नोंदविलेले आहे.[१]

बोधचिहन


स्वरूप संपादन

या बोधचिह्नावर असलेल्या पझलच्या प्रत्येक तुकड्यावर एकेक अक्षर नोंदवलेले आहे.विकिपीडियाचे बहुभाषिकत्व याद्वारे प्रातिनिधिकरूपात दाखविलेले आहे. अर्मेनिअन⟨Վ⟩ v, कंबोडिअन⟨វិ⟩, बंगाली⟨উ⟩  जाॅर्जिअन ⟨ვ⟩  मध्यभागी डावीकडे ग्रीक  ⟨Ω⟩ चायनीज ⟨維⟩ ,कन्नड ⟨ವಿ⟩  तिबेटिअन⟨ཝི⟩ अशी भाषिक चिह्ने असून मध्यभागी उजवीकडे लॅटिन Latin ⟨W⟩ तसेच वरच्या बाजूला जपानी⟨ウィ⟩  सिरिलिक ⟨И⟩ हिब्रू ⟨ו⟩  तमिळ ⟨வி⟩ अशी भाषिक चिह्ने आहेत.सर्वात उजवीकडे इथियोपिक⟨ው⟩, अरेबिक ⟨و⟩ कोरिअन⟨위⟩ आणि थाई Thai ⟨วิ⟩  अशी चिह्ने आहेत.[२] वरच्या बाजूचा अपूर्ण तुकडा प्रकल्पाचे अपुरे राहिलेले काम दाखविणारा आहे.अद्याप जागतिक बोलीभाषांपैकी काही भाषांचे विकिपीडिया तयार होणे हे काम अपेक्षित आहे.त्याचे हे निदर्शक आहे.

प्रक्रिया संपादन

 
विकिमीडिया फाउंडेशन कार्यालयातील चिहन

या बोधचिह्नाचे प्राथमिक स्वरूप पाॅल स्टॅन्सिफर यांनी २००३ साली बोधचिह्न स्पर्धेसाठीतयार केले होते.त्यावेळी ते १७ वर्षाचे होते.डेव्हिड फ्रेंडलँड यांनी या बोधचिह्नात काही सुधारणा केल्या आहेत.याप्रक्रियेत काही भाषिक त्रुटीही लक्षात आल्या.देवनागरी आणि जपानी भाषेतील लेखनाच्या या चुका होत्या. २००९ साली विकिमीडिया फाउंडेशनने काही धोरणे निर्धारित करून काही त्रुटी सुधारल्या. या चिहणाची परिमाणे सदोष होती त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि काही विखुरलेल्या अक्षरांवर काम करण्यात आले. या चिन्हाचे संगणकीय त्रिमितीय प्रतिकृती तयार करण्यात आली.[३]अशाप्रकारचा अर्धाकृती आकार विकिमीडिया कार्यालयात लावण्यात आलेला आहे. २०१० साली अक्षराची खूण असलेलया विकिपीडिया या शब्दाची सुधारणाही करण्यात आली. उभ्या आडव्या रेषांमध्ये जोडल्या गेलेल्या वी आणि डब्ल्यू या अक्षराच्या स्थानात आवश्यक सुधारणा करण्यात आल्या.

विकिबाॅल संपादन

 
विकिबाॅल

२००७ साली एक सुधारित त्रिमितीय चिह्न तैवान येथील तैवानी विकिमीडियाने तयार केले.यात शिल्लक असलेल्या जागेत काही अक्षरांच्या जोडीने विकीपिडियाच्या बंधुप्रकल्पाची माहिती थोडक्यात नोंदविण्यात आली.मानवी खेळाच्या आकाराचा हा चेंडू तयार करून तो प्रदर्शनीय वस्तू म्हणून ठेवला गेला.यातूनच पुढे त्रिमिती स्वरूपाचा चेंडू तयार करण्याला चालना मिळाली.


अंकित मुद्रा संपादन

आधीची मुद्रा ही युरोपीय समुदायाचे बोधचिहन म्हणून विकिमीडिया फाउंडेशन ने निर्धारित केले होते. २० जानेवारी २००९ रोजी त्याची अधिकृत नोंदणी करण्यात आली.[४]

संदर्भ संपादन

  1. ^ "Startpage - Libertine Open Fonts Projekt". web.archive.org. 2010-06-30. Archived from the original on 2010-06-30. 2021-01-09 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "Wikimedia official marks/About the official Marks - Wikimedia Foundation Governance Wiki". foundation.wikimedia.org (इंग्रजी भाषेत). 2021-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ Walsh, Jay (2010-05-13). "Wikipedia in 3D". Diff (इंग्रजी भाषेत). 2021-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Search for a trade mark - Intellectual Property Office". trademarks.ipo.gov.uk (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-01-12. 2021-01-09 रोजी पाहिले.