विकिपीडिया चर्चा:नवीन सदस्यांना मार्गदर्शन

welcome

लिपी नव्हे 'विपी'च हवे का ? संपादन

@सुहास बनसोडे:

नमस्कार,

प्रथमत: आपल्या संपादन प्रयत्नांबद्दल आभार. विपी हा शब्द विकिपीडिया शब्दाचा शॉर्टफॉर्म म्हणून वापरला गेला असण्याची शक्यता वाटते. कदाचित पूर्ण विकिपीडिया शब्द वापरल्यास वाचकांचा गोंधळ होणार नाही, आपण केलेला बदल पुन्हा एकदा तपासून पाहिल्यास बरे पडेल किंवा कसे. परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:३८, २१ डिसेंबर २०१५ (IST)Reply

हो Rajendra Apugade (चर्चा) २०:१८, ८ जुलै २०१९ (IST)Reply

मराठी लेखन साहित्य संपादन

लेखक व त्याची ग्रंथसंपदा या विषयी चर्चा..

यादव बा-हाळे १६:५६, ३१ मे २०१८ (IST)

Mpsc संपादन

Exam Suryawanshi Mahesh Sanjay (चर्चा) १९:१८, २४ डिसेंबर २०१८ (IST)Reply

17 Feb 2019 Suryawanshi Mahesh Sanjay (चर्चा) १९:१९, २४ डिसेंबर २०१८ (IST)Reply

महाराष्ट्राची लोकसंस्कृती : कलापथक संपादन

भारतातील लोकांना शेतात घाम गाळून, कबाडकष्ट करुन अन्नधान्य पिकवावे लागते. या कष्ट करणाऱ्यांना करमणुकीची आवश्यकता असते. म्हणून लोकांनीच आपल्या कल्पनेप्रमाणे करमणुकीचे वेगवेगळे प्रकार निर्माण केले. त्याच या लोककला होत. पुढे यातील काही लोककला जातिपरत्वे रुढ झाल्या. गावकुसाबाहेरच्या लोकांना कलेची आवड होतीच. त्यांनी ढोलकी आणि तुणतुण्यावर गाणी म्हणून आपली करमणूक करुन घेण्यास सुरुवात केली. “महाराष्ट्रात रुढ असलेल्या करमणुकीच्या प्रकाराची प्रथा इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेल्या ‘हाल’ या राजाच्या काळापासून सापडते. हाल राजा हा सातवाहनाच्या वंशातला असून, त्याची राजधानी ‘प्रतिष्ठान’ उर्फ पैठण येथे होती.”  

महाराष्ट्रात वेगवेगळे लोककला प्रकार बघायला मिळतात. लोककलेच्या उपासकांनी काही अमुल्य कलांचे अजूनही जतन करुन ठेवले आहे. परंतू काही लोककला काळाच्या ओघात नष्ट किंवा नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यांचे जतन आणि संवंर्धन करणे काळाची गरज आहे. लोकांनी लोकांच्या मनोरंजनासाठी निर्माण केलेल्या या लोककला नामशेष होऊ नयेत म्हणून शासनाने चांगली पावले उचलली आहेत. अनेक लोककला प्रकारांना शासनाने अनुदान द्यायला सुरुवात केली आहे. कलापथक किंवा कलाजत्रा म्हणजे गावोगावी फिरुन भक्तीगिते, लोकगिते गाणाऱ्या किंवा पौराणिक गोष्टी सांगणाऱ्या कलाकारांचे पथक, अशी ढोबळमानाने व्याख्या करता येईल. लोकशिक्षण हे त्यांचे ध्येय असते. पेशवाईनंतर पारतंत्र्याच्या काळात छत्रपती शाहू महाराजांनी शाहीर वर्गाचा उपयोग सामाजिक विषमता घालवण्यासाठी केला. त्याचप्रमाणे सत्यशोधक समाजानेही या माध्यमांचा वापर केला. समाजातील मागासलेपनावर, जाचक रुढी परंपरांवर, शेतकऱ्यांच्या शोचनीय अवस्थेवर, धार्मिक अवडंबरावर, शाहिरांनी लावण्या, पोवाडे रचले आणि त्याव्दारेच समाजात सुधारणा घडवून आणल्या. कलापथकांच्या माध्यमातून केलेले प्रबोधन म्हणजे केवळ ज्ञान नसून, सामान्य माणसाला प्रगत जीवनाकडे नेणारी दृष्टी होय. या जीवनदृष्टीबरोबरच अलौकीक व भव्य जीवनाबद्दलची लालसा त्याच्या मनात निर्माण करणे हेच कलापथकाचे प्रमुख कार्य असते, हे छत्रपती शाहू महाराजांना ज्ञात होते, म्हणूनच त्यांनी लोककलांना आणि त्यांचे जतन करणाऱ्या कलावंतांना राजाश्रय देण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवाच्या काळात गावोगावी गणेश मेळे व्हायचे, आजही काही ठिकाणी होतात. ग्रामीण भागातील लोकांना नऊ दहा दिवस विविध मनोरंजनाची मेजवाणी मिळते. दिवसभर कामधंदा करुन, थकूनभागून आलेले कष्टकरी लोक आणि स्त्रीयांसह बालगोपाळ रात्री सुरु होणाऱ्या मेळ्याच्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. गावागावांतून प्रत्येक दिवशी नवीन गणेश मेळा मंडळाचा कार्यक्रम ठरविलेला असायचा. या मेळ्यातून गायन, वादन, नाच, नाटके, नकला अशा सर्व कलाप्रकारांचे एकत्रीत सादरीकरण होत असे. नामांकितांबरोबरच नवोदित कलाकरांनाही या मेळ्यातून आपापले कलाप्रकार सादर करायला मिळायचे. अनेक वर्षे चाललेल्या या गणेश मेळ्यातून अनेक दिग्गज कलाकार उदयाला आले आहेत. मेळ्यांचा भार न सोसवणाऱ्या काही पांढरपेशा शाहिरांनी कलापथके काढली. पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक प्रचाराचे कार्यही केले आहे. शाहिरांचे कलापथक अशीच ती संकल्पना होती. याच कलावंतांनी १९५५ च्या आसपास लोकनाट्याचा बाज सुरु केला. त्यात पोवाड्याशिवाय अन्य कलाप्रकार सादर करण्यात येऊ लागले. १९ व्या शतकात समाज जागृती, समाज प्रबोधन, वैचारिक आणि पक्षीय प्रचार इत्यादी विविध उद्देशाने काही नाट्यरुपांची आणि तमाशाप्रधान लोकनाट्याची निर्मिती झाली. तमाशाचा उपयोग सामाजिक व राजकीय प्रचारासाठी करण्यात आला. कलापथके ही त्याचीच एक परिणत अवस्था असल्याचे सांगितले जाते. लोककलेच्या लौकिक प्रयोजनासंबंधी विचार आणि त्यातून लोक शिक्षणासाठी लोककलांचा वापर, हा भारतीय संस्कृतीचा अंगभूत भाग आहे. एकनाथी भारुडांपासून ते आजच्या अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या रिंगणनाट्यापर्यंत विविध कला थकल्या भागलेल्या लोकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात. कालानुरुप त्यांचे स्वरुप बदलले असले तरी लोकरंजन आणि लोकशिक्षण हि सुत्रे एकत्रितपणे आणि प्रभावीपणे काम करताना दिसतात. कलाप्रकार बदल स्विकारत असला तरी त्यांचा उद्देश मात्र लोकरंजनातून प्रबोधन असाच राहिला आहे. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वीच जयप्रकाश नारायण म्हणत, ‘सन बयालीस की क्रांती अधुरी है, हमें और आगे जाना है..’ – या पुढच्या तयारीचा भाग म्हणून नवभारत घडवण्याच्या उमेदीने १९४२ साली लालबावटा कलापथकाची आणि १९४८ साली राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाची निर्मिती झाली. असा उल्लेख सापडतो, परंतू त्यावरही सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. या संबंध काळाच्या तपशीलवार लेखी नोंदी उपलब्ध होत नाहीत. कलापथकांचा उद्देश लोकप्रबोधन असला तरी लालबावटा कलापथकाचे कार्य वेगळे आणि राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाचे कार्य वेगळे होते. लालबावटाने लोकसंस्कृतीचे जतन करण्याबरोबर कामगार आणि वंचित, दुर्लक्षीत वर्गाचे प्रबोधन करण्याकडे कल ठेवला होता. त्यासाठी त्यांनी पोवाडे, लावण्या, गाणी अशा माध्यमांचा वापर केला. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकांनी स्वातंत्र्य आंदोलनासाठी जनमत तयार करणे, सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणे, नाटिका, वगाच्या माध्यमातून आणि विविध प्रकारच्या गीतांतून प्रेरणादायी विचार संक्रमीत करण्याचे कार्य केले. या काळात कलापथकात दाखल होणारी मुले-मुली विभिन्न स्तरातली असत. पण ती एका कुटुंबातील असावीत, असा जिव्हाळ्याचा बंध त्यांच्यात निर्माण होत असे. राष्ट्राभिमानाचा जोश, शिस्त, भरपूर अंगमेहनत याचबरोबरीने तिथल्या एकूण वातावरणात मोकळेपणा आणि मजाही असे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लोकमानसात रुजविण्याचे महान आणि महत्त्वपूर्ण काम शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांच्यासह सीमा प्रदेशातील विविध भागातील हजारो ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले. त्याच्यामुळे लोक प्रेरित झाले. हजारो, लाखो लोक भारावून जात व लढ्यात सहभागी होत. आधुनिक शाहिरी परंपरेचा आविष्कार होऊन जे नवे प्रवाह उदयास आले आहेत, त्यापैकी जलसा आणि कलापथके प्रभावी ठरली होती. पुढे दीर्घकाळ या कलाप्रकारांनी समाजप्रबोधन, वैचारिक, सामाजिक क्षेत्रात आपला प्रभाव टिकवून ठेवला. १९६०-७० पर्यंत दक्षिण व मध्य मुंबईच्या कामगार राहत असलेल्या भागात अनेक चाळी होत्या. तेथे घरकाम करणारे बानकोटी बाले असायचे. दोन चार घरी भांडीकुंडी करुन ते आपली गुजरान करीत असत. चाळीच्या बोळात किंवा गॅलरीत वास्तव्य करीत असत. अशा लोकांची कलापथके होती. मोजकी वाद्ये व ठरलेल्या भडक वेशात त्यांचे फेर धरुन केलेले नृत्य ‘बाल्या नाच’ म्हणून त्याकाळात प्रसिद्ध होते. नाच करणाऱ्यांच्या मधोमध ढोलकी, पेटी वगैरे वाजविणारे बसायचे. त्यांच्याभोवती हे बाले फेर धरुन नाचायचे. एका ठेक्यावर पाय आपटून त्यांचा नाच होत असे. संपूर्ण चाळ हादरुन जाईल असा तो नाच असायचा. ‘पारबती बाई बसली न्हायाला, बसली न्हायाला, तिनं आंगीचा मल काढीला, मल काढीला, आनि मग तेचा गन लिपीला, गन लिपीला’ असे गाणे म्हणून वाद्याच्या तालावर हे बाले नाचत असत. चाळीच्या बोळातच हा कार्यक्रम चालत असल्याने प्रेक्षकांना बसण्याची वेगळी व्यवस्था नव्हती. आपापल्या घरातून लोक हा कार्यक्रम बघायचे. जलसा, कलापथक आणि पथनाट्य हे आधुनिक शाहिरांचे प्रवाह आहेत. ‘जलसा’ हा कलाप्रकार महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार करण्यासाठी अस्तित्वात आला. त्यास ‘सत्यशोधक जलसा’ असे म्हटले जावू लागले. मराठी भाषा, मराठी वाङमय आणि मराठी लोककला या प्रकारातून जी एक सांस्कृतिक धारा विकसित होत गेली, त्यात 'जलसा' हा प्रकार विकसित होत गेला. हा कला प्रकार महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने रंजनातून लोक जागृती करण्यासाठी निर्माण केला. त्यातून आंबेडकरी जलसे निर्माण झाले. त्याचा वापर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी करण्यात आला. सामाजिक परिवर्तनाचे माध्यम म्हणून आंबेडकरी जलशांचे कार्य मोलाचे ठरले. हजारो वर्षांची गुलामगिरी, अन्याय, जुलूम, उपासमार, मानहानी, अव्हेरलेले त्यांचे मानवी हक्क मिळविण्यासाठीचा संघर्ष या जलशातून प्रकट होताना दिसतो. यात भिमराव करडक, केरुजी घेगडे, अर्जून भालेराव, केरु गायकवाड, वामनदादा कर्डक यांचे योगदान मोलाचे आहे. दुसरा आधुनिक शाहिरीचा प्रकार म्हणजे कलापथके होय. जलशांप्रमाणेच ‘कलापथक’ हा प्रबोधनात्मक शाहिरीचा एक प्रकार १९४५ च्या सुमारास उदयास आला. शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी ‘लाल बावटा कलापथका’ची स्थापना करुन शाहिरी परंपरेमध्ये नव्याने मोलाची भर घातली. गाणी, पोवाडे, लावण्या, वग, नाट्य किंवा लोकनाट्य या शाहिरी ढंगांच्या दृकश्राव्य गटास ‘कलापथक’ हे अर्थपूर्ण नाव मिळाले. या कलापथकाचा प्रभाव खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या माध्यमातून निर्माण झाला. १९४५ ते १९६० पर्यंत यासंबंधी भाषिक अस्मितेच्या प्रेरणा, जनभावना या कलापथकाने जनतेसमोर मांडल्या. महाराष्ट्रात एक नवचैतन्य निर्माण केले. त्या काळात जी प्रभावी कलापथके होती, त्यात लालबावटा कलापथक हे अत्यंत प्रभावी होते. याशिवाय जी कलापथके महाराष्ट्रात अस्तित्वात होती, ती सर्वच कलापथके आपल्या पक्षाचा, संघटनेचा, दलाच्या विचारांचा प्रसार करीत होती. यामध्ये पक्षीय, वैचारिक प्रवाहही होते. साम्यवादी कलापथके, समाजवादी कलापथके, काँग्रेस सेवादलाची कलापथके आणि आंबेडकरवादी भीम कलापथकेही होती. महाराष्ट्राच्या तमाशा व कलापथकाच्या जुन्या परंपरेला नवी वर्गीय दृष्टी देण्याचा प्रयत्न लालबावटा कलापथकातील शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हणाकर यांनी केला. अण्णाभाऊंची शाहिरी कविता जनमाणसांध्ये रुजविण्याचे काम लालबावटा कलापथकाने केले. हे कलापथक म्हणजे कामगारांना संघटित करुन, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरणा देणारी एक शक्तीच होती. लालबावटा कलापथकातून सामाजिक क्रांतिसाठी आवश्यक असणारा विद्रोह पेरला गेला. त्यामुळेच या कलापथकाच्या कार्यक्रमांवर सरकारने नंतर बंदी आणली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलन काळात शाहिरी परंपरेच्या या आधुनिक कलापथकाने मराठी भाषिकांचा, त्यांच्या अस्मितेच्या, अभिमानाला साद घालण्यात लालबावटा कलापथक यशस्वी झाले. स्वातंत्र्योत्तर काळात तमाशातील अश्लीलतेमुळे दारुबंदीप्रमाणेच तमाशाबंदीही करण्यात आली. तत्कालिन मुंबई सरकारचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी लोकनाट्यावर बंदी घातली. ‘तमाशा सुधार समितीने’ काही अटी घालून दिल्या, त्या अटी तमाशा फडांनी मान्य करुन, त्या चाकोरीत तमाशाचे प्रयोग करण्याच्या अटींवर तो पुन्हा सुरु करण्यात आला. या बंदीच्या काळात लालबावटा कलापथकाची संपूर्ण जबाबदारी शाहीर गव्हाणकर यांच्याकडेच होती. अण्णाभाऊंच्या लोकनाट्यावर सरकारने बंदी घातलेली असतानाही शाहीर गव्हाणकर यांनी मुंबई, बेळगाव, इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर, निपाणी, कारवार या भागात कलापथकाचे कार्यक्रम आयोजिक केले होते. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ताकद वाढली होती. सरकारच्या या धोरणामुळे कलापथकांना बळ मिळाले. १९२७ च्या महाडच्या सत्याग्रहानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला विचार आपल्या बांधवांना समजावून सांगण्यासाठी ‘संगीत जलसा’ वा ‘संगीत कलापथक’ निर्माण झाले. महाडचा रणसंग्राम, काळाराम-मंदीर प्रवेश, ब्राम्हण-अस्पृश्य संवाद, दारू, सट्टा इ. विषयांवर वग रचून, जलशांद्वारा लोकांचे प्रबोधन शाहीर केरू अर्जुन घेगडे, अकोल्याचे केरू बाबा गायकवाड, नासिकचे भीमराव कर्डक या नामवंत तमाशागिरांनी आपल्या तमाशांतून केले. त्यानंतर ‘आंबेडकरी जलसा’, ‘आंबेडकरी तमाशा’ अशी नावे रूढ झालेली दिसतात. साम्यवादी विचारांचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा प्रसार करण्यासाठी कलापथकांतून वर्गविग्रह, कामगार-भांडवलदार संघर्ष, शेतकऱ्यांची दुःखे इ. विषयांवर वग सादर केलेले दिसून येतात. शाहीर अमर शेख यांनी सर्जेराव फरारी, जाऊ तिथं खाऊ हे वग लिहिले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कलापथकाला ‘लोकनाट्य’ अशी संज्ञा दिली. अकलेची गोष्ट, शेटजीचे इलेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मूक मिरवणूक, लोकमंत्र्याचा दौरा इ. लोकनाट्ये लिहिली. पारंपरिक तमाशातील बतावणीचा कौशल्याने वापर करून अण्णाभाऊ साठे यांनी वगांची रचना केली. शाहीर विश्वासराव फाटे यांनीही सात दिवसाचा राजा, वगैरे सात लोकनाट्ये लिहिली आहेत. शाहीर नानिवडेकरांचे फॅशनचा वग, किसरूळचा शेतकरी, वसाडगावचा जमीनदार हे वग लोकप्रिय होते. राम उगावकर, आत्माराम पाटील, शाहीर पुंडलिक फरांदे, शाहीर बापूसाहेब विभुते, शाहीर पांडुरंग वनमाळी, शाहीर खामकर, शेख जैनू चाँद इ. नामवंतांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. शाहीर साबळे यांनी नाटकातला बंदिस्तपणा आणि तमाशातील विस्कळितपणा टाळून रामराज्यात एक रात्र, ग्यानबाची मेख, आंधळ दळतंय इ. मुक्तनाट्ये लिहिली. लोकगीते आणि लोककला यांचा कौशल्याने वापर करून उपरोधात्मक शैलीच्या द्वारे शाहीर साबळे यांनी मुक्तनाट्यांतून प्रबोधन केले. अलिकडे तमाशाचे स्वरुप नाटकासारखे होत चालले आहे, पण तो तमाशाचा प्रकार नव्हे. त्याशिवाय अलिकडच्या वीस-पंचवीस वर्षात तमाशावरुन त्याला ‘लोकनाट्य’ म्हणण्याची पध्दत पडली. असा एक प्रकार उत्पन्न झाला आहे. या लोकनाट्याचे विषय बहुधा राजकीय पक्ष, राजकीय परिस्थिती हेच असतात. सरकारी नियमातून पळवाट काढण्यासाठी लोकनाट्यातील काही बाज उचलून तो ‘कलापथक’ म्हणून सादर करण्यात येऊ लागला. कलापथकाचा हेतू लोकांची करमणूक करणे आणि विशिष्ट पक्षाचा प्रचार लोकांच्या मनावर बिंबविणे हाच असतो. अशा कलापथकात जातीचा आणि विशिष्ट पक्षाचा प्रचार केल्यामुळे बरीच मंडळी दुखावतात. कलापथकाला प्रेक्षक मिळत नाही, म्हणूनच अशी कलापथके जशी लवकर निर्माण होतात, तशीच ती लवकर नष्टही होतात. लोकरंजनातून लोकशिक्षण हे ब्रीद घेऊन निर्माण झालेल्या राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाने स्वातंत्र्याच्या आंदोलनासाठी प्रबोधन केले. निळू फुले यांच्या अभिनयाचा पाया राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकाने घातला. या कलापथकाव्दारे प्रबोधन आणि मनोरंजन यांचा संयोग साधून लोकनाट्ये व्हायची. त्यातला अर्धा भाग लिखित आणि अर्धा स्वयंस्फूर्त असायचा. या कलापथकाने ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाचे ३०० प्रयोग केले. या कलापथकातून निळू फुले यांच्या बरोबरच राम नगरकर, दादा कोंडके, स्मिता पाटील, प्रमोद पवार, झेलम परांजपे, सुहिना थत्ते, ज्योती सुभाष, लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शक सदानंद राणे यांच्यासारखे महान कलाकार लोकरंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिले. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून स्वातंत्र्याच्या आंदोलनाबरोबरच स्त्री भ्रूणहत्या, बलात्कार, बॉम्ब स्फोट, घातपात, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे अनेक विषय सादर करुन लोक प्रबोधन केले आहे. स्वयंस्फूर्तीने दाखल होणारी मोठी ऊर्जा आणि सेवादलाचा ध्येयलक्षी हेतू, या माध्यमातून कलापथकाने नवनवे कार्यक्रम निर्माण केले. अभिजात कलापरंपरेशी नाते ठेवत आणि त्याच वेळी लोकपरंपरेचा धागा सांभाळत नवा आशय प्रभावीपणे पोचवणारे अनेक कार्यक्रम कलापथकाने सादर केले. सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावणे तो अधिकाधिक निर्दोष बनवणे यासाठी आवश्यक ती भूमी तयार करण्याचे, जीवनदृष्टी घडवण्याचे काम केले आहे. समूहगान, नृत्य, तमाशा, लोकनाट्य इत्यादीमधून सामूहिकतेचे संस्कार नकळत झाले. हे कलाप्रकार लोकांच्या जवळ आणले. त्यामुळे कला, कलाशिक्षण याविषयीची लोकमानसातील नकारात्मक भावना सौम्य होण्यास हातभार लागला. त्यातून नवा, परिवर्तनाला पोषक आशय मांडण्याच्या प्रयत्नामुळे वैचारिक जागृतीचे कामही काही प्रमाणात घडले आहे. कलापथकांचे आजचे अस्तित्व नगण्य आहे. परंतू हा प्रवाह कुंठित होतो, असे जाणवत नाही. यातूनच ‘कलापथक’ हा कलाप्रकार समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या शाहिरी आणि अभिनयाने भाष्य करतो. १९४८ ते १९६० याकाळात कलापथकाच्या एकजिनसी रचनेत बदल झाले. राष्ट्रसेवा दलाच्या १९६० च्या ‘महाराष्ट्र दर्शन’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यावसायिक कलाकार आले. कलापथकातील सहभागींना सेवादलाच्या शाखाप्रवृत्तीचा अनुभव असावा, हा विचार मागे पडला. त्यापूर्वी कलापथकाचे कार्यक्रम स्थानिक सामान्य कार्यकर्ते आयोजित करत. कलापथकातील मंडळी त्या त्या गावी कार्यकर्त्यांकडे रहात-जेवत. ‘महाराष्ट्र दर्शन’पासून कलापथकाचा ताफा मोठा झाला. साहजिकच सामान्य कार्यकर्त्यांच्या घराशी असणारा संबंध क्षीण होत गेला. बाहेरही एकूण जीवनसरणी बदलत होती. १९८० नंतर ध्येयवादापासून तुटलेला, स्वातंत्र्यसंग्रामाची वास्तपुस्त नसलेला नवमध्यमवर्ग निर्माण झाला, ही कलापथकाची शेवटच्या काळातली कोंडी होती. कलापथक थांबले ते संघटनात्मक निर्णयाने आणि बदलत्या काळाचे संदर्भही त्याला थांबवणारे ठरले. विकोपाला गेलेल्या व्यवहारीपणामुळे आज नागर जीवनातील मिथ्याचा नाश झाला आहे. सुखोपभोगांची अनंत साधने प्रत्यही वाढत असूनही आधुनिक माणूस तृप्त नाही, शांत नाही. त्याच्या तृष्णा शमविण्याचे काम केवळ लोककलाच करु शकतात. त्यासाठी लोककलांचे जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ लोकसंस्कृतिच्या उपासकांनीच नाही, तर संशोधक आणि बुध्दीवादी लोकांनीही त्यासाठी आपले योगदान द्यायला हवे. महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलेचा वारसा जतन व संवर्धन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेषत: ग्रामीण भागात तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी इत्यादीसारख्या कला सादर करणाऱ्या लोककलांच्या कलापथकांना महाराष्ट्र शासनाने भांडवली अनुदान व प्रयोग अनुदान पॅकेज योजना सन २००८-०९ मध्ये सुरु केली आहे. प्रतिवर्षी प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या संख्येनुसार कलापथकांना भांडवली व प्रयोग अनुदान मंजूर करण्यात येते. यामध्ये पूर्णवेळ तमाशासाठी वीस लाख रुपये, हंगामी तमाशा/दशावतारसाठी दहा लाख, खडीगंमत/शाहिरी कलाप्रकारासाठी दहा लाख आणि संगीतबारीसाठी दहा लाख रुपये असे एकूण पन्नास लाख रुपयांचे भांडवली अनुदान दिले जाते. तसेच पूर्णवेळ ढोलकी फड/तमाशा फडासाठी साठ लाख रुपये, हंगामी तमाशा फड आणि दशावतार मंडळांसाठी एक लाख वीस हजार, खडी गंमत कला पथके आणि शाहिरी पथके/ लावणी, कला पथके (संगीत बारी) साठी ४२ लाख असे एकूण दोन कोटी २२ लाख रुपयांचे प्रयोग अनुदान दरवर्षी दिले जाते. --प्रा.डॉ. बाबा बोराडे. प्रकाशन : कमांडर दिवाळी अंक २०१९

Return to the project page "नवीन सदस्यांना मार्गदर्शन".