विकिपीडिया चर्चा:चढवून हवी असलेली छायाचित्रे

मराठी विकिपीडियावरील नवीन चित्र संचिका चढवण्याची प्रक्रीया प्रताधिकारपूर्ण करण्याच्या दृष्टीने विकिमीडिया कॉमन्स आणि इंग्रजी विकिपीडियाच्या धर्तीवर काही पानांची निर्मिती प्रस्तावीत आहे. त्या अंतर्गत en:Wikipedia:Files for upload हे पान त्यातील साचे आणि प्रक्रीया पूर्ण करावयास लागणार्‍या संबंधीत सर्व पानांची विकिपीडिया:चढवून हवी असलेली छायाचित्रे येथे निर्मिती करून हवी आहे. हे कुणा एका कडून होणारे काम नाही सर्वांनी थोडा थोडा हातभार लावावा. माहितगार ०८:२१, २१ ऑक्टोबर २०११ (UTC)

Submit a request याचे भाषांतर

संपादन

Submit a request याचे मराठीत अधिक नेटके भाषांतर करावे, असे वाटते. सध्या "विनंती सादर करा" असे लिहिले आहे, त्यात काहीसा "भाषांतरितपणअ" डोकावतोय (ते सहज व अनुवादित रूप वाटत नाहीय.).

"विनंती नोंदवा" किंवा "विनंती दाखल करा" हे अधिक नेटके वाटेल काय ? किंवा याहून अन्य चपखल पर्यायही चालतील.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५७, २६ ऑक्टोबर २०११ (UTC)

शीर्षकात सुयोग्य बदल करण्यास माझी हरकत नाही माहितगार १२:१७, २६ ऑक्टोबर २०११ (UTC)
Return to the project page "चढवून हवी असलेली छायाचित्रे".