विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२

(विकिपीडिया:WAM 2022 या पानावरून पुनर्निर्देशित)

विकिपीडिया आशियाई महिना

विकिपीडिया आशियाई महिना हे एक ऑनलाईन अभियान आहे. याचा उद्देश आशियाई देशांमधील समूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि विविध प्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान वाढावे हा आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर हे अभियान राबविले जाते. या उपक्रमात मराठी विकिपीडियामध्ये चांगल्या लेखांची भर पडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकी संपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी, आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते वृद्धींगत व्हावे हाही एक उद्देश आहे.

या स्पर्धेची पहिली आवृत्ती २०१५ मध्ये झाली आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी लेखांची संख्या वाढत गेली आणि सहभागींनी या लेखांमध्ये वैविध्य आणले आणि लेखांचा विस्तार केला. गेल्या सात वर्षांत, ४,३०० हून अधिक विकिपीडिया संपादकांद्वारे ६४पेक्षा अधिक भाषा-विशिष्ट विकिपीडियांमध्ये ४९,७८२पेक्षा अधिक उच्च-गुणवत्तेचे लेख जोडले गेले आहेत.

या उपक्रमात तुम्हाला सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास डिजीटल बार्नस्टार मिळेल. अर्थातच तुम्ही चारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.

काही विषय/संकल्पना

विकिपीडिया आशियाई महिना २०२२ खालील विषयांवर केंद्रित असेल

  1. शिंटो मंदिर (जपानमधील ही एक अद्वितीय रचना आहे. शिंटो धर्मातील एक किंवा अधिक कामी (देवता) वसवणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. या इमारतींद्वारे जपानी धर्माबद्दल जाणून घेऊया.)
  2. आशियातील इस्लाम (जगातील 62% मुस्लिम आशियामध्ये राहतात. इस्लामचे अनेक अनुयायी आशियामध्ये विशेषतः पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियामध्ये इस्लामिक इतिहासाच्या सुरुवातीपासून राहतात. आशियातील इस्लामिक इमारती, स्मारके, इतिहास, व्यक्ती, कला किंवा चालीरीतींबद्दल अधिक जाणून घेऊया!)
  3. मध्य आशियातील निसर्ग (मध्य आशिया हा उंच मार्ग, पर्वत, विस्तीर्ण वाळवंट, वृक्षविहीन आणि गवताळ मैदानासह विविध भूगोल परिदृश्यांचा प्रदेश आहे. मध्य आशियातील नैसर्गिक सौंदर्य पाहूया.)
  4. ऑस्ट्रोनेशियन भाषा (ऑस्ट्रोनेशियन भाषा हे 1,257 भाषा असलेले एक मोठे भाषिक कुटुंब आहे, जे कोणत्याही भाषा कुटुंबातील दुसऱ्या क्रमांकाचे आहे. स्वतः भाषा आणि या भाषांमधील वंशीय गट, लेखक, साहित्यिक आणि दंतकथा यावर संशोधन करा.)

नियम

थोडक्यात: नवीन लेख हा आशिया खंडातील देशांतील विषयांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट आकाराचा, २०२२च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा; आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.

  • हा लेख तुम्ही १ नोव्हेंबर २०२२ (UTC) आणि ३० नोव्हेंबर २०२२ (UTC) दरम्यान स्वतः बनवलेला असला पाहिजे.
  • सदर लेख किमान ३००० बाईट आकाराचा आणि किमान ३०० शब्दांचा असावा. (महितीचौकट, साचे सोडून)
  • सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्यांची सत्यता स्पष्ट असावी.
  • लेखातील भाषा शुद्ध असली पाहिजे, अर्थात लेख पुर्णतः मशीनद्वारे रूपांतरित केलेला नसावा.
  • कॉपीराईट उल्लंघन किंवा उल्लेखनियता यासारख्या प्रमुख समस्या लेखात नसाव्यात. (उल्लेखनियता स्पष्ट असावी)
  • लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  • सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
  • सदर लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा.
  • स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
  • स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे मराठी भाषेतील परीक्षक निर्धारित करतील.
  • जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे किमान ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून डिजीटल बार्नस्टार देण्यात येईल.
  • तुम्ही 'विकिपीडिया आशियाई दूत' घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.

या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.

संदर्भ दुवे

आयोजक/ परीक्षक

  1. Tiven2240
  2. Sandesh9822
  3. संतोष गोरे

साइन अप

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा (साइन अप करा) आणि तुमचे योगदान द्या.

लेख सादर करा

तुम्ही लेख तयार केल्यानंतर खाली लिंक असलेल्या फाउंटन टूलद्वारे लेख सबमिट करावे.

सहभागी व विजेते

उपयोगी दुवे

मेटावरील मूळ दुवा, स्थानिक एडिट-अ-थॉन

मान्यता