विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/92

  • Indian Copyright Law चे कलम ६३  : ६३ ते ७० फौजदारी दाव्यांसंबधी कलमे आहेत. कलम ६३ knowingly म्हणजे प्रताधिकार इतर कुणाचे आहेत हे माहिती असूनही प्रताधिकार उल्लंघन करत असेल अथवा प्रताधिकार उल्लेंघनास उत्तेजन दिले जात असेल तर लागू होते.
कलम ५५ मधील तरतुदी प्रमाणेच एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही परिस्थितीत जोखीम हलकी करतात असे वाटते का ? यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे का ?
कलम ६३: प्रताधिकार उल्लंघ करणाऱ्याने उल्लंघन व्यवसाय अथवा व्यापारासाठी केले नसल्यास फौजदारी कलमांतर्गत येत असलेली किमान ३ महिने तुरुंगवास आणि किमान ५० हजाराचा दंड ही शिक्षा, संबंधीत न्यायालय, त्यांना तसे पटल्यास केसला लागू पडणारी विशेष आणि पुरेशी कारणे नमुद करून या शिक्षा सौम्य करू शकते.
याचा अर्थ प्रताधिकार उल्लंघन व्यवसाय अथवा व्यापारासाठी केले नसलेतरी, शिक्षा सौम्य होण्याची शक्यता कदाचित गृहीत धरूनही, उल्लंघन हे उल्लंघनच राहते असे आपणास वाटते का ?
संबंधीत न्यायालय शिक्षा सौम्य करेल की नाही केली तर किती करेल हे त्या त्या केसवर अवलंबून असेल असे वाटते का ?