Indian Copyright Law चे कलम ५५ उपकलम १ वाचा : कलम ५५ मधील तरतुदी दिवाणी जोखीम नमुद करतात, आणि एखाद्या उल्लंघन कर्त्यास, एखाद्या कृतीत इतर कुणाचा प्रताधिकार असल्याचे माहीत नसल्यास काही अटींवर जोखीम हलकी करतात असे दिसते. यात कायद्याबद्दलची अनभिज्ञतेचा अंतर्भाव होत नाही हे लक्षात घेतले पाहीजे.
एखाद्या कृतीवर प्रताधिकार नमुद केला नसेल तर ती आपोआपच कायद्यानुसार प्रताधिकारीत होते म्हणजे केवळ विशेष परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीने तो स्वत: प्रताधिकार धारक नसतानाही असल्याची बतावणी केल्यामुळे अथवा कृतीवर एका पेक्षा अधिक लोकांचे अधिकार आहेत आणि त्यातील एका प्रताधिकार धारकाने इतर अजुन कुणी प्रताधिकार असल्याची कल्पनाच दिली नाही अशा प्रकारच्या विशेष परिस्थितीत हा बचाव उपयूक्त ठरत असावा असे वाटते का ?
अधिक माहिती आणि संदर्भ
1) Where copyright in any work has been infringed, the owner of the copyright shall, except as otherwise provided by this Act, be entitled to all such remedies by way of injunction, damages, accounts and otherwise as are or may be conferred by law for the infringement of a right:
PROVIDED that if the defendant proves that at the date of the infringement he was not aware and had no reasonable ground for believing that copyright subsisted in the work, the plaintiff shall not be entitled to any remedy other than an injunction in respect of the infringement and a decree for the whole or part of the profits made by the defendant by the sale of the infringing copies as the court may in the circumstances deem reasonable.
Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोत प्रकल्पात अभ्यासताना (तो अचानक अयोग्य पद्धतीने बदलला गेलेला नाही हे लेख इतिहास तपासून खात्री करा;) मूळ कायदा दस्तएवजांसोबत अचूकते साठी पडताळून घ्या. बेअर ॲक्ट वाचून झाल्या नंतर संबंधीत कलमांचा उल्लेख झालेले न्यायालयीन निकालही वाचून घेणे सयुक्तीक असू शकते हे लक्षात घ्या.