विकिपीडिया:विशेष सजगता/6
लेखात स्वतःला वाटणारा कोणत्याही गोष्टीचा अभिनिवेश, व्यक्तिगत अभिमान, द्वेष काहीही व्यक्त करणे उचित नाही. तसेच तुम्हाला तुमचे व्यक्तिगत दृष्टिकोन स्वतःच्या सदस्य पानावर मांडण्याचे पुरेसे स्वातंत्र्य असते.
'विशेषणांचा वापर टाळा' संदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यक्तिगत दृष्टिकोन मांडण्याचा आग्रह आणि पूर्वग्रह किंवा एकांगी लेखन टाळावे. असे न केल्यास, लेखाची विश्वासार्हता कमी होऊन फायद्याऐवजी नुकसानच होण्याचा धोका संभवतो.
काही वेळा आपली माहिती वस्तुनिष्ठ असते परंतु नेमका संदर्भ हाताशी नसल्यामुळे किंवा न आठवल्यास, लेखन करावे परंतु स्वतःच्याच लेखनाशेजारीसुद्धा {{संदर्भ हवा}} साचा लावावा.