विश्वकोश संकल्पना

संपादन

विश्वकोशांना स्वतःचा विशीष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती वाचत असतो. (इथे वाचकांना रूक्षता अपेक्षीत नसते, पण निव्वळ ज्ञान आणि माहिती हवी असते. वाचकाचा दृष्टीकोण: आम्ही मोजक्या Facts आणि statistics सह वाचतो.आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशीष्ट संदर्भासहीत सांगा, पण आमचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका असा असतो.)

सारे विश्वकोश विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता सहसा वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात.त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.