विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२०


विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२०

या प्रकल्पात विकिपीडिया मराठी भाषेमधील महिला संपादकांचे योगदान वाढविणे आणि दक्षिण आशियाई महिलांविषयी चरित्रे तयार करणे हे आहे.

संकल्पना

संपादन

या वर्षी स्त्रीवाद, महिलांची चरित्रे, लिंग समानता विषयक लेख असावेत. लोक संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान या विषयावर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न या अभियानात अपेक्षित आहे. (लोककलाकार, गायक, नर्तकी, संगीत दिग्दर्शिका, पौराणिक स्त्रिया, युद्धातील सहभागी स्त्रिया , जादूटोणा क्षेत्रातील महिला, तसेच परीकथा आणि अन्य साहित्यातील महिलांच्या संद्रभातील लेखांचे येथे स्वागत आहे.

कालावधी

संपादन

१ फेब्रुवारी, २०२० - ३१ मार्च, २०२०

  • विस्तारित लेखात किंवा नवीन लेखात किमान ३००० बाइट आणि ३०० शब्द असावेत.
  • लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रुपांतर) भाषांतरित नसावा.
  • लेखाचा विस्तार १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२० दरम्यान संपादित करावा.
  • हा लेख लोकसंस्कृतीतील महिलांचे स्थान, स्त्रीवाद, महिलांची चरित्रे अशा विषयी असावा.
  • लेखामध्ये कॉपीराइटचे उल्लंघन आणि सूचनाचे प्रश्न असू नयेत आणि लेखात विकिपीडिया धोरणानुसार योग्य संदर्भ असावेत.

परितोषिके

संपादन
  • टी-शर्ट आणि टोटे पिशवी प्रथम ५ योगदानकर्त्यांसाठी आणि परीक्षकांसाठी दिले जाईल.
  • डीजीटल पोस्टकार्ड आणि बॅर्नस्टार किमान ४ ज्ञानकोशीय दर्जाचे लेख तयार करणाऱ्या संपादकांसाठी आहे.

नवनिर्मित आणि विस्तारित लेख

संपादन

सदर संकल्पनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही विषयांवर लेख तयार करण्याचे व सुधारण्याचे स्वातंत्र्य सर्वसंपादकांना राहील. त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचना पहाव्यात.

नोंदणी करा

संपादन

येथे नोंदणी करा व आपले योगदान सादर करा:

परीक्षक

संपादन

हे देखील पहा

संपादन