विकिपीडिया:रामविसं मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा मालिका २०१७
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.२०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी खालील कार्यशाळा संपन्न झाल्या.