विकिपीडिया:भूगोल/मुख्यलेख

भूगोल
भूगोल

भूगोल ही पृथ्वी, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील व भूगर्भातील वैशिष्ट्यांचा, तसेच पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि या सर्वांतील परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. भूगोलाच्या मानवी भूगोलभौतिक भूगोल अश्या दोन ढोबळ उपशाखा आहेत. या दोन्ही उपशाखांमध्ये पर्यावरण आणि जीवावरण यांच्या निर्मितीचा अभ्यास होतो. मानवी दृष्टिकोनातून मानवाचा प्रभाव व मानवाचे पृथ्वीवरील महत्त्व यांचा अभ्यास करणे हे मानवी भूगोलाच्या उपशाखेचे उद्देश्य असते, तर भौतिक भूगोलाच्या उपशाखेत पर्यावरण, वातावरण, वनस्पती, जीवन, माती, जल आणि भूरचना हे सर्व कश्या प्रकारे एकमेकांवर प्रभाव टाकतात यांचा अभ्यास केला जातो.