विकिपीडिया:धूळपाटी/feminist praxis
फेमिनिस्ट प्रेक्सिस:रिसर्च, थियरी अंड ऎपिस्टेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी हे लिज स्टॅनलेचे रुटलेज प्रकशनाद्वरे १९९० मध्ये प्रकाशित पुस्तक आहे. सदरच्या ज्ञानमीमांसाशास्त्राने स्त्रियांमधील भिन्नत्वाच्या स्वीकारावर व ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध (un-alienated knowledge's) लक्षात घेण्याकडे विशेष भर दिलेले आहे. स्त्रीवादी ज्ञानमीमांसा/ पद्धतीशास्त्र व पारंपारिक पद्धतीशास्त्र यामधील भिन्नत्व दाखविणारी बरीच पुस्तके असली तरीही त्याचे रुपांतर स्त्रीवादी संशोधन करताना व्यवहारात कसे करावे याबाबत पुस्तके कमी असताना दिसतात. स्त्रीवादी संशोधकांना डोळ्यासमोर ठेवून, Feminist Praxis या पुस्तकात लिज स्टॅनले यांनी वसाहतवाद, child-minding, गे पुरुष, स्त्रीवादी समाज कार्य, कर्करोग, नाटक या माध्यमाच्या सहाय्याने तरुणांमधील काम, मार्लिन मोनरोय, संख्याशास्त्र आदींवर आधारित लेखांच्या संकलनाद्वारे स्त्रीवादी ज्ञानमीमांसेला स्त्रीवादी संशोधन प्रक्रियेत रुपांतरीत करण्याची प्रक्रिया दाखवून दिली आहे.
भाग १
संपादनस्त्रीवादी संशोधन ज्या वातावरणात व स्थानात घडते ते समजण्यास मदत करायला संपादक अध्यापन क्षेत्रात स्त्रिया व स्त्रीवाद्यांचे स्थान दाखवून देण्याचा प्रयत्न पहिल्या भागात करतात. पहिल्या भागातील दोन्ही धड्यांच्या माध्यमातून संपादक स्त्रीवादी संशोधनाबाबतीतील विचारांना एका सामाजिक संदर्भात म्हणजेच अध्यापन क्षेत्रातील उत्पादनाच्या पद्धतीत स्थापित करतात. पहिल्या लेखात लेखक पारंपारिक संशोधन प्रक्रियेमधील उत्पादन संबंध व त्याला चालना देणारे शक्तिशाली घटक यांचा आढावा घेतात ज्यामुळे निर्मित ज्ञान, हे ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेपासून विलग होते (alienated knowledge) व त्यामधील संबंध झाकोळले जाते. तसेच ते स्त्रीवादी संशोधनाचे वेगळेपण या दोन्ही मधील संबंध जोडून ज्ञान निर्मिती करण्यात (un-alienated knowledge) कसे आहे हे दाखवून देतात. ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध (un -alienated knowledge's) जोडणे म्हणजे निर्मित ज्ञानावर, ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेचा, संशोधनकर्त्याच्या विचारांचा, पूर्वग्रहांचा परिणाम स्वीकारणे तसेच तटस्थ ज्ञान निर्मितीच्या विचारांना छेद देत उत्पादनाच्या मीमांसेत संशोधनकर्त्याचे स्थान, त्याची भूमिका, विचार, भावना या सर्वांचे विश्लेषण अंतर्भूत करणे असे होय. या पुस्तकात 'ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध' जोडणारे ज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर सविस्तर मांडणी केलेली आहे. या भागातील दुसऱ्या धड्यात लिज स्टॅनले व स्यू वाईस स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची तात्विक पार्श्वभूमी मांडतात. स्त्रीवादी संशोधन प्रक्रियेतील पद्धती, पद्धतीशास्त्र व ज्ञानमीमांसे संदर्भातील समकालीन चर्चेचा आढावा येथे घेतलेला दिसतो. तसेच विविध संकल्पनांचे अर्थ जसे 'स्त्रीवादी भूमिदृष्टीची ज्ञानमीमांसा', 'मौन केलेल्या स्त्रीवादी भूमिदृष्टीची' समस्या जिथे काळ्या स्त्रीवादी व लेस्बिअन स्त्रीवाद्यांनी प्रस्थापित स्त्रीवाद्यांवर केलेल्या टीकेचा समावेश आहे, किंवा ‘स्त्रीवादी अधिसत्ता’ निर्माण करण्याचे मोह आदींवर भाष्य करण्यासाठी लेखक महत्वाच्या तत्वज्ञांच्या (सॅन्ड्रा हार्डिंग, डोरोथी स्मिथ, मेरिलिन फ्राय आदी) विचारांचे चिकित्सात्मक पद्धतीने चर्चा करतात. या पुढील भागात संपादक आपल्याला उदाहरणाद्वारे स्त्रीवादी तत्वज्ञानाचे व्यवहारात रुपांतर कसे करावे हे दाखवून देतात.
भाग २
संपादनपुस्तकातील दुसऱ्या विभागातील ५ भागांद्वारे संपादक आपल्याला ज्ञान निर्मितीसाठीच्या संशोधन प्रक्रियेचे विविध व्यावहारिक उदाहरण दाखवून देतात ज्यात संशोधन विषयाची व्याख्या व सुरुवात, संशोधनात वापरण्यात आलेल्या पद्धतीचे विश्लेषण, संशोधांच्या लिखित किंवा दृष्य निष्कर्षांचे विश्लेषणाचा समावेश केलेला आहे. या विभागातील धड्याना आपण अभ्यासलेल्या विशिष्ठ विषयावरील योगदान किंवा स्त्रीवादी संधोधन प्रक्रियेतील उदाहरण म्हणून बघू शकतो. सर्व धड्यांमध्ये 'ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध' जोडणारे ज्ञान निर्माण करण्याबाबत प्रचंड श्रद्धा झळकते. हे पुस्तक फ़क़्त स्त्रीवादी पद्धतीशास्त्राने पारंपारिक पद्धतीशास्त्राला केलेले आव्हानच पुढे आणत नाही, तर सोबतच स्त्रीवादी संशोधन व तत्वज्ञानातील विहित नियमांनाही आव्हान देते. स्त्रीवादी संशोधन हे स्त्रियांच्या अनुभवावरच आधारलेले असावे या गृहितकाला जोयस लेलँड त्यांच्या लेखातून छेद देतात. एका गे मुलाची आई असल्यामुळे, गे पुरुष, पुरुषत्वाची व्याख्या वेगळ्या तऱ्हेने कशे करतात व त्याचा परिणाम त्यांचे स्त्रियांशी असलेल्या नात्यावर कसा पडतो या प्रश्नाकडे लेलँड खेचल्या गेल्या1. तसेच डेनिस फेरान, मार्लिन मोनरोय च्या चित्राला बघण्याचे वेगळे पर्याय सुचवतात ज्यांच्या चित्राला बहुतेक वेळा लैंगिकतेच्या अभ्यासासाठी बघितले गेलेले दिसते. दुसऱ्या बाजूला सदरचे धडे माहितीच्या विश्लेषणाच्या प्रक्रिये बाबत भाष्य करतात. डेनिस फरान तरुण मुलांच्या करमणूकी संदर्भातील मुलाखतींना सांख्यिकीय माहितीत रुपांतरीत करण्याची प्रक्रिया तिच्या लेखाद्वारे दाखवून देते. त्या प्रक्रियेत कशा पद्धतीने सत्याची एक आवृत्ती रचली जाते ज्याला समजून घेण्यासाठी संदर्भ माहिती असणे आवश्यक आहे, हे ती दाखवते तसेच कोडींगच्या प्रक्रियेत कशा प्रकारे तिची व्यक्तीनिष्ठता दिसून येते हे समोर आणत ती संख्यात्मक माहिती सुद्धा व्यक्तीनिष्ठ असते हे दाखवून देते तसेच तठस्थता व व्यक्तीनिष्ठ्ते मधील भेद मोडून काढते. तसेच ऐन तेइट, शस्त्रक्रियेनी स्तन काढण्यात आलेल्या (masectomy ) एका महिलेच्या मुलाखतीचे विश्लेषण करताना दाखवून देते कि त्या महिलेचे अनुभव वेगळे बघून चालणार नाहीत तर तेइटचा संशोधन प्रक्रियेतील सहभाग पण आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. किंबहुना ते दोन्ही एकत्र बघण आवश्यक आहे.
निष्कर्ष
संपादनएकंदरीत या पुस्तकातील लेखांमुळे आपल्याला संशोधन प्रक्रियेचे विश्लेषण करणे, तसेच आपल्या स्वतःच्या अनुभवांना महत्व देणे व अभ्यासाला स्त्रीवादी अभ्यास बनवण्याची प्रक्रिया समजून घेणे शक्य होईल.