विकिपीडिया:धूळपाटी/अभिजात दर्जा

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी सर्व स्थरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे. शहरातील पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच टाकण्याचा आग्रह करतात व त्याचेच अनुकरण ग्रामीण भागातील पालकही करत असल्याने मराठी माध्यम असणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी होत आहे हि अतिशय चिंतेची बाब आहे. इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकवर पाहिजे त्या विषयासंबंधी भरपूर माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांची विचार क्षमता व चिंतनशीलता कमी होत आहे. या सर्व बाबींवर गंभीरतेने चर्चा होवून ठोस असा निर्णय घेवून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी विशेषतः उच्च शिक्षण विभागाकडून प्रयत्न होणे व त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

डॉ. एस.आर.जाधव (प्राचार्य)

नानासाहेब य.ना. चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगांव जि. जळगांव (महाराष्ट्र)