विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/संकीर्ण
चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्यावर आत्तापर्यंतची चर्चा थोडीशी विस्कळीत आणि अनेक कल्पनांचा ठाव घेणारी झाली आहे. ह्या चर्चेचा संक्षीप्त आणि मुद्देसूद गोषवारा संकीर्ण माहितीच्या निमित्याने येथे देत आहोत. सर्व सदस्यांना ह्या बाबतची आपली मते शक्य तितक्या लवकर चावडीवर मांडण्याचे नम्र आवाहन. ..!
- १. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.
विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.
- २. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
- ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
- ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
- गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
- वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
- ३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
- व्यक्तिगत समस्या
- मदतीसाठी
- दुरुस्तीसाठी सूचना
- सूक्ष्म सूचना
- गप्पा-टप्पा
- ४. यात कोण भाग घेऊ शकेल.
ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.
- ५. या पानाच उद्दिष्ट काय.
ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत
- भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
- ध्येयाची आखणी करणे
- ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
- ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
- ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
- गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
- ६. इतर
सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना - सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाच्या वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.
- ७. पुरोगामी मराठी विपी
मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे.
धन्यवाद !