१. हे पान तांत्रिक प्रश्न अशा स्वरुपाचे आहे.चर्चेचा विषय तांत्रिक चर्चेच्या पुरते मर्यादीत असावेत .
१.१ पानाचे स्वरूप तांत्रीक शंका आणि निरसनाचे , तांत्रीक बाबीतील इंप्लीमेंटेशन मध्ये तंत्रज्ञांचे सहकार्याची विन्ंती करण्याचे आहे. धोरण विषयक चर्चा शक्यतोवर धोरण चावडीवर घेऊन तांत्रीक शंका निरसन , आणि तांत्रीक बाबीतील इंप्लीमेंटेशन विनंती या पानावर घ्यावे.
२. संपादन गाळणी व्यवस्थापन विषयक नेमक्या सुधारणा आणि चर्चा विकिपीडिया चर्चा:संपादन गाळणी पानावर अथवा संबंधीत गाळणी करिताच्या विशेष चर्चा पानावरच सुचवा .त्या तांत्रिक चावडीवर घेऊ नयेत.
२.१ केवळ संपादन गाळणी परिष्कृत करताना तांत्रीक अडचणीत तंत्रज्ञांचे लक्ष अधीक विस्तृत प्रमाणावर वेधण्या करिता संपादन गाळणीच्या चर्चा पानावरील दुवा आणि तांत्रीक चर्चेत संबंधीत पानावर सहभागी होण्याची विनंती अथवा संबंधीत तांत्रीक अडथळा दूर करून देण्यात सहकार्याची विनंती तेवढी तांत्रीक चावडीवर मांडावी.
३.मिडियाविकि नामविश्वातील बदलांबद्दलच्या चर्चा संबंधीत चर्चा पानावर घेऊन प्रचालकांचे लक्ष प्रचालक चावडीवर वेधावे.
३.१ केवळ मिडियाविकि नामविश्वातील तांत्रीक गोष्टी परिष्कृत करताना तांत्रीक अडचणीत तंत्रज्ञांचे लक्ष अधीक विस्तृत प्रमाणावर वेधण्या करिता मिडियाविकि चर्चा पानावरील दुवा आणि तांत्रीक चर्चेत संबंधीत पानावर सहभागी होण्याची विनंती अथवा संबंधीत तांत्रीक अडथळा दूर करून देण्यात सहकार्याची विनंती तेवढी तांत्रीक चावडीवर मांडावी.
४. चर्चेचा फोकस तांत्रिक विषयांवर रहावा म्हणून विषयांतरे कठोरपणे टाळली जावीत.
४.१ इतर (सु/वि)संवाद साधण्यासाठी सदस्य चर्चा पाने,इतर चावड्या उपलब्ध आहेत त्यातील संबधीत पानाचा आधार घ्यावा.
४.२ येथे व्यक्तिगत आरोप किंवा शिविगाळ केल्यास असा मजकूर ताबडतोब काढावा व अशा सदस्यास इशारा द्यावा. व्यक्तिगत हाणामारी इतरत्र केल्यास त्या पानांबद्दलचे धोरण लागू करावे. ते येथे irrelevant आहे.
४.३ तांत्रीक चर्चे करिता आवश्यक नसलेला मजकुर मुद्दास सोडून असेल. येथील मजकूरातील मुद्द्यास सोडून असलेला भाग काढून टाकावा/विषयांतर साचात टाकावा . सदस्याला याबद्दल योग्य सूचना/विनंती शक्यतर करावी.