श्री.वासुदेवराव वर्तक १९६० च्या दशकात मुंबईतील दादर भागातील प्रसिद्ध सानेगुरुजी विद्यालयातील नोकरी सोडून मागासलेल्या आगरवाडी परिसरात माध्यमिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे वा.ग.वर्तक. ते आगरवाडी शाळेत सन १९६३ मध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. कठोर शालेय शिस्त, उत्तम शिक्षक, कुशल प्रशासक आणि समर्पित भावना ह्यांच्या जोरावर त्यांनी आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवून ठाणे जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची नामवंत शाळा म्हणून प्रसिद्धी मिळवली.१९७२ ची निवडणूक जिंकून ते ठाणे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले.१९७७ साली पुन्हा निवडणूक जिंकून ते ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांची राजकीय कारकीर्द चटाळे गावाच्या सरपंचपदाने झाली. त्यांची विचारसरणी समाजवादी होती आणि ते समाजवादी पक्षात कार्यरत होते.त्याकाळी ते समाजवादी नेते सर्वश्री.एस.एम.जोशी,नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान, मधु दंडवते, सदानंद वर्दे ह्यांच्या निकट संपर्कात होते.[१]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी,शनिवार दिनांक २८ जानेवारी २०२३