वाळकेश्वर मंदिर
वाळकेश्वर मंदिर किंवा बाणगंगा मंदिर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर दक्षिण मुंबईतील मलबार हिलच्या वाळकेश्वर भागात स्थित आहे. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव इ.स. ११२७ साली लक्ष्मण प्रभू नावाच्या गौड सारस्वत ब्राह्मण व्यक्तीने बांधले. १६व्या शतकातील पोर्तुगीज राजवटीने हे मंदिर पाडून टाकले परंतु १७१५ साली राम कामत नावाच्या श्रीमंत इसमाच्या औदार्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत