वार्ता (संस्कृत कार्यक्रम)

(वार्ता या पानावरून पुनर्निर्देशित)

वार्ता हा एक भारतीय दूरदर्शन कार्यक्रम आहे, ज्यामध्ये संस्कृतमध्ये बातम्या प्रसारित केल्या जातात.[१][२] भारतातील सार्वजनिक प्रसारक असलेल्या डीडी न्यूझवर हा कार्यक्रम रोज सकाळी प्रसारित होतो.[३]

वार्ता
प्रकार दूरदर्शन कार्यक्रम
निर्माता डीडी न्यूझ
निर्मिती संस्था दूरदर्शन
देश भारत
भाषा संस्कृत
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सकाळी ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी डीडी न्यूझ
चित्र प्रकार SDTV
अधिक माहिती
सारखे कार्यक्रम वार्तावली

सुरुवातीला हा कार्यक्रम ५ मिनिटांचा होता, जो आता १० मिनिटांंचा आहे. कार्यक्रम पूर्णपणे संस्कृत भाषेत तयार केला जातो. २०१५ पासून डीडी न्यूझवर "वार्तावली" नावाचा दुसरा संस्कृत कार्यक्रम प्रसारित केला जातो, जो अल्पावधीत लोकप्रिय झाला. यामध्ये बातम्यांबरोबर चर्चा, गीतांचे भाषांतर, इतर माहिती दाखवली जाते.[२]

इतिहास संपादन

अनेक वर्षांपासून डीडी न्यूझवर रोज सकाळी ६.५५ वाजता 'वार्ता' नावाचे संस्कृतमधील न्यूझ बुलेटिन प्रसारित होते. तथापि, नंतर हा कालावधी दहा मिनिटांपर्यंत वाढवण्यात आला. पाच मिनिटांचे बुलेटिन खूप लहान कालावधीचे असल्याने हे करण्यात आले.[२]

हेदेखील पाहा संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Vaarta : Sanskrit News । देश-दुनिया की तमाम अहम ख़बरें संस्कृत में   | DD News". ddnews.gov.in. 2022-07-07 रोजी पाहिले. no-break space character in |title= at position 68 (सहाय्य)
  2. ^ a b c Venugopal, Vasudha. "Sanskrit set to make a comeback on Doordarshan this July focussing on events from around the world".
  3. ^ "Vaarta: News in Sanskrit Language VIDEO: - Latest Tweet by DD News | 📰 LatestLY". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2022-07-07 रोजी पाहिले.