वारकरी (पक्षी)
पक्ष्यांच्या प्रजाती
वारकरी किंवी चांदी (इंग्लिश: Coot; हिंदी:आरी, खाराकुल, टीकारी; गुजराती:आड, दसाडी) हा एक पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने लहान कोंबडीएवढा असतो. अंगाने लहानखुरी भुंडी असते. पाण्यात तरंगताना दुरून बद्कासारखा दिसतो. कपाळावर चांदीसारखा टिळा असतो. चोच हस्तीदंतासारखी पांढरी असते. ह्यावरून तिची ओळख पटते. पायाची बोटे कातडीने जोडलेली असतात. नर मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी थव्याने आढळून येतात.
वितरण
संपादनभारतीय उपखंड आणि श्रीलंकेत निवासी आणि जुलै – ऑगस्ट या काळात आढळतात.
निवासस्थाने
संपादनहे पक्षी दलदली आणि सरोवरे, झिलानी, आणि तळी या भागात आढळतात.
संदर्भ
संपादन- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली