वारकरी शिक्षण संस्था

महाराष्ट्रामध्ये अनेक वारकरी शिक्षणसंस्था आहेत.

विष्णुबुवा जोग यांनी आळंदी येथे स्थापन केलेली संस्था ही पहिली वारकरी शिक्षण संस्था. ही संस्था त्यांनी इ.स. १९१७ साली स्थापन केली.

संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारूतीबुवा गुरव यांच्या प्रयत्नाने झाली.

ती आज वारकरी शिक्षण संस्था सद्गुरू जोगमहाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाते.

अन्य काही वारकरी शिक्षण संस्थाही आहेत. त्या अशा :-

 • वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची
 • भारतीय संगीत कलापीठ (महाराष्ट्रात सर्वप्रथम वारकरी संगीत परीक्षा अभ्यासक्रम रचना करून या परीक्षांचे सन २०१७-१८ पासून यशस्वी आयोजन)
 • श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा ता.सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर (स्थापना 2007)
 • कोंडाजीबाबा (डेरे) वारकरी शिक्षण संस्था (पर्णकुटी), पारुंडे-जुन्नर (पुणे जिल्हा)
 • जोग महाराज भजनी मठ (वारकरी शिक्षण संस्था), इगतपुरी (नाशिक जिल्हा)
 • जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था (पिंपरी गाव)
 • परमार्थ वारकरी शिक्षण संस्था, पिंपरूड
 • लोकराज्य वारकरी शिक्षण संस्था, उस्मानाबाद
 • वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र तेर (उस्मानाबाद जिल्हा)
 • संत वारकरी शिक्षण संस्था, खेड (आळंदी)
 • ज्ञानवैष्णव वारकरी शिक्षण संस्था, आळंदी
 • ज्ञानसाई वारकरी शिक्षण संस्था, भोसरी (पुणे)
 • वडेश्वर वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र चिंचवण (वडाचे) ता. सिल्लोड जिल्हा, छत्रपती. सांभाजीनगर

या वारकरी शिक्षण संस्थांमध्ये महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांच्या वाङ्‌मयाचा अभ्यास करवून घेतला जातो आणि कीर्तन-प्रवचन-हरिकथा आदींचे प्रशिक्षण दिले जाते.