मराठी वाक्प्रचार

मराठी व्याकरण प्रकार
(वाक्प्रचार या पानावरून पुनर्निर्देशित)

शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार अथवा भाषेतील संप्रदाय असे म्हणतात.

  • अग्निदिव्य करणे.
अर्थ : कठीण कसोटीला उतरणे.
  • अटकेपार झेंडा लावणे.
अर्थ : फार मोठा पराक्रम गाजवणे.
  • अठरा विश्वे दारिद्र्य असणे.
अर्थ : पराकोटीचे दारिद्र्य असणे.
  • सर्वस्व पणाला लावणे.
अर्थ : सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
  • साखर पेरणे.
अर्थ : गोड गोड बोलून आपलेसे करणे.
  • सामोरे जाणे.
अर्थ : निधड्या छातीने संकटास तोंड देणे.


मराठी संप्रदायांचा संग्रह असलेली पुस्तके

संपादन
  • मराठी भाषेचे वाक्प्रचार व म्हणी (वि.वा. भिडे)
  • मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी (वा.गो. आपटे)
  • भारतीय कहावत संग्रह (तीन खंड) (संपादक - विश्वनाथ दिनकर नरवणे)
 
विकिक्वोट
मराठी वाक्प्रचार हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.