वांगी (दक्षिण सोलापूर)
वांगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील एक गाव आहे.
?वांगी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | सोलापूर |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मध्यम आणि चांगले हवामान असते. सोलापूर कोरडे हवामानाच्या श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. सोलापुरात हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
संपादनवांगी येथील लोकजीवन साधारण असून ह्या गावातील सर्व लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करतात. तसेच येथील लोक पशुपालन, मजुरी व मासेमारी व्यवसाय करतात. वांगी ह्या गावातील लोकसंख्या जवळपास 2850 च्या आसपास असून सर्वात जास्त मुस्लिम समाज आहे. त्यासोबत लिंगायत, धनगर, कोळी समाज जास्त प्रमाणात आहे. महार, मांग, चांभार आणि गुरव सोबतच अनेक जाती धर्माचे गाव म्हणून पंच क्रोशीत नाव आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादनमहादेव मंदिर, पीर दर्गा, पुरातन स्वामी मठ, हनुमान मंदिर, देवी मंदिर
नागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनवडकबाळ, नंदुर, मनगोळी, गावडेवाडी, मंद्रुप, ठेंगे वस्ती, समशापुर