वसंत शंकर हुजुरबाजार

वसंत शंकर हुजुरबाजार ( १५ सप्टेंबर १९१९ - १५ नोव्हेंबर १९९१ ) हे नामवंत संख्याशास्त्रज्ञ होते. पुणे विद्यापीठात संख्याशास्त्र विभागाचे ते पहिले प्रमुख होते. १९७४ साली त्यांना त्यांच्या संख्याशास्त्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले गेले.

त्यांचे मूळचे गाव कोल्हापूर हे होते.