वर्थूर प्रकाश
वर्थूर प्रकाश (१९६६ - ) कर्नाटक राज्यातील एक राजकारणी आहे. ते नम्मकाँग्रेस पक्षाचे नेते आहेत. प्रकाश कोलार विधानसभा मतदार संघातून ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेले.[१]
राजकीय कारकीर्द
संपादनप्रकाश यांनी कोलार मतदारसंघातून २००२, २०१३ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आणि प्रत्येक वेळी ते विजयी झाले. डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या सरकारमध्ये त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून काम पाहिले. याशिवाय ते जगदीश शेट्टर यांच्या सरकारातही मंत्री होते. परंतु २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते जेडीएस पार्टीचे के श्रीनिवास गौडा यांच्याकडून पराभूत झाले. ते नम्मकाँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत.[२]
संदर्भ
संपादन- ^ "Kolar Election Result 2018 Live: Kolar Assembly Elections Results (Vidhan Sabha Polls Result)". News18. 2021-07-06 रोजी पाहिले.
- ^ "Kolar Assembly Election Result 2018: Kolar Candidates Lists, Winners and Votes". www.indiatoday.in. 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-07-06 रोजी पाहिले.