वर्ग चर्चा:त्सुनाम्या

त्सुनामीचे बहुवचन त्सुनाम्या होईल का? मामीचे माम्या होते खरे, त्सुनामी स्त्रीलिंगी ठरेल का? तसेच काही शब्दांचे (भूकंप, आजोबा), विशेषतः परभाषेतील शब्दांचे बहुवचन करताना हे लागू होईलच असे नाही.

अभय नातू १७:०९, १४ मार्च २०११ (UTC)

लेखात आणि विकिपीडियाखेरीज अन्य माध्यमांमध्ये 'त्सुनामी' ही विशेष प्रकारातली 'लाट' असल्याचे ध्यान बाळगून 'त्सुनामी आली/पसरली/धडकली' वगैरे शब्दयोजना आढळते. याचाच अर्थ, जपानीतून हा शब्द उसना घेतल्यावर तिला लाटेप्रमाणे स्त्रीलिंग आरोपण्याचा कल मराठी भाषकांमध्ये दिसतो. प्रस्तुत लेखातही हेच दिसून येते. त्यामुळे वर्ग:कंपन्या या शीर्षकाप्रमाणे बहुवचनी रूपाचे लेखन वर्ग:त्सुनाम्या असे होणे अधिक योग्य ठरेल. शिवाय परभाषअंमधील शब्दांचे प्रचलित लिंग ध्यानी घेऊन त्या-त्या लिंगाच्या व अंत्य स्वराच्या व्याकरणनियमांप्रमाणे अनेकवचने योजायची पद्धत मराठीत व विकिपीडीयावरदेखील दिसते - उदा.: वर्ग:भारतीय नौदलाच्या फ्रिगेटा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:३८, १५ मार्च २०११ (UTC)

फ्रिगेटा हा शब्द मीच योजला होता, पण त्याच्या अचूकतेबद्दल मी साशंकच आहे.

अभय नातू ०५:३३, १५ मार्च २०११ (UTC)
त्सुनामी या सामान्यनामावर बहुश: आरोपल्या जाणाऱ्या स्त्रीलिंगासाठी असलेल्या व्याकरणनियमांप्रमाणे 'त्सुनाम्या' हे अनेकवचनी रूप सध्यातरी अधिक तार्किक वाटते; त्यामुळे तूर्तास तसे रूप राहू द्यावे. या सामान्यनामाचे अन्य कोणतेही रूप व्याकरणनियमांच्या तार्किक विस्ताराने योग्य असल्याचे स्पष्ट झाल्यास, त्यानुसार योग्य ते स्थानांतरण करता येईल.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १०:०७, १५ मार्च २०११ (UTC)
"त्सुनाम्या" पानाकडे परत चला.