वरी, वरई किंवा भगर हे भारतात उगवणारे एक भरड धान्य तथा तृणधान्य आहे. महाराष्ट्रात याच्यापासून भात, पुऱ्या, भाकरी, थालपिठे आदी उपवासाचे अन्नपदार्थ बनतात.[] हे धान्य वऱ्याचे तांदूळ किंवा भगर म्हणूनही ओळखले जाते. कांग, कोदरी, कोदो, कुटकी, नाचणी, राळे प्रमाणेच या धान्यालाही कनिष्ठ प्रकारचे धान्य समजतात. प्रथिने व फायबर यांचे प्रमाण जास्त असल्याने आरोग्यास हे धान्य पोषक समजले जाते. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.[]भारतीय केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०१८ हे वर्ष तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे.[] तसेच संयुक्त राष्ट्र संघानेही हे वर्ष जाहीर करावे यासाठी प्रयत्न केले. भगर हे उपवास करीता वापर होतो.

Echinochloa frumentacea

अन्य शब्द

संपादन
  • इंग्रजी : स्मॉल मिलेट
  • गुजराती : सामो, मोरियो
  • शास्त्रीय नाव : Echinochloa colona
  • हिंदी : मोरधन, सवा का चावल

भगरीचे प्रकार

संपादन

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील आदिवासी पारंपरिक पीक म्हणून भगरीचे नियमित उत्पादन घेत असतात. तेथील आदिवासी भगरीला पादी, बर्टी आणि मोर असे म्हणतात. त्यानुसार त्याभागात पांढरी मोर, मोठी मोर, काळी मोर असे भगरीचे पारंपरिक प्रकार दिसून येतात. कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी मोठ्या प्रयत्नाने या भगरीला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देऊन हे प्रकार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवले.[]

 
पादी भगर (नंदुरबार जिल्हा)
 
काळी मोर भगर (नंदुरबार जिल्हा)
 
पांढरी मोर भगर (नंदुरबार जिल्हा)
 
फुले एकादशी भगर (नंदुरबार जिल्हा)

संदर्भ

संपादन
  1. ^ "खाद्यवारसा : वरई भाकरी". लोकसत्ता. ४ मे २०१८. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ संचेती, गौतम (२४ नोव्हेंबर २०१७). "वरई, नागलीला अच्छे दिन?". महाराष्ट्र टाईम्स. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "Centre to declare 2018 as national year of millets". द हिंदू. २० जानेवारी २०१८. २६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  4. ^ "'भगर'ने दिला रोजगार". लोकमत १८. २७ मे २०१८ रोजी मूळ पान पासून संग्रहित.