वरंध घाट

(वरंधा घाट या पानावरून पुनर्निर्देशित)

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट नावाचा २० किलोमीटर लांबीचा डोंगरी रस्ता आहे. हा घाट सह्याद्रीच्या उभ्या धारेवर असलेल्या कावळ्या किल्ल्याला दुभंगून देशावरून कोकणात उतरतो. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. महाडपासून २५ किलोमीटर, पूर्व  पुण्यापासून ११० किलोमीटर अंतरावर आहे.  वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. या ठिकाणापासून, दरीतील आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये दिसतात. कोंकणाच्या दिशेला ३००० फुटांच्या खोल दरीमुळे वस्त्यांसह अतिशय खडबडीत खोरी आहेत.

वरंधा घाट

घाटाच्या वरच्या बाजूला भुते आहेत असे म्हणतात. तालुक्याच्या गावात भूत राहते. मध्यात वाघजाई भूत आहे. व उताराच्या शेवटाला कोकणातली माझेरी, वरंध आणि बिरवाडी ही गावे येतात. तेथून कोकणात अन्यत्र जाणारे रस्ते आहेत. त्या घाटात भुते आहेत, वाघजाई समोरचा एक भलामोठा डोंगर अजस्र शिवलिंगाच्या आकाराचा आहे. पावसाळ्यात त्याच्या चहुअंगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात.

भूत वाघजाईच्या पुढे लगेच एका खिंडीतून घाट डावीकडे वळतो. या खिंडीच्या दोन्ही अंगांचे डोंगर म्हणजेच कावळ्या ऊर्फ मनमोहनगड किल्ला आहेत. या गडाच्या वाघजाईकडील बाजूच्या डोंगरामध्ये नऊ खोदीव टाकी आहेत. तर दुसऱ्या बाजूस अशीच काही टाकी व शिबंदीच्या घरांचे अवशेष दिसतात. इतिहासात फारसा परिचित नसलेल्या या गडावर प्राचीन काळापासून वाहत्या असलेल्या या घाटवाटेवर लक्ष ठेवण्याचे काम होते. अशी ही घाटवाट पुढे ब्रिटिशांनी इ.स. १८५७ मध्ये सव्वा लाख रुपये खर्चून पक्की केली.