वढेरा घराणे
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
सोनिया गांधी या काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांच्या कन्या प्रियांका गांधी यांचा विवाह वढेरा आडनावाच्या रॉबर्टशी झाला. वढेरा घराण्याचे सर्व प्रमुख धर्मीयांशी नाते संबंध आहेत.
आडनावाचे लेखन
संपादनआडनावाचे इतर लेखन वड्रा/वाड्रा/बढेरा.दिल्ली-पंजाब या भागात अनेकदा बोलताना शब्दातल्या दुसऱ्या अक्षराचा उच्चार हलन्त होतो. इंदिराचा उच्चार इंद्रा, सोनियाचा सोन्या, आणि म्हणून वढेराचे वढ्रा. इंग्रजीत ढ नाही म्हणून वढ्राचे वड्रा वा वाड्रा. वड्राचे बंगाली पद्धतीने बड्रा आणि हिंदी पद्धतीने वद्रा.
व्यवसाय आणि इतिहास
संपादनफाळणीपूर्व काळात सियालकोट येथे हुकुमत राय वढेरांचा खेळाच्या वस्तूंचा(स्पोर्ट्स) व्यवसाय होता. तो त्यांनी भारतात स्थलांतरित होताना सोडून दिला व ते आपल्या पत्नी आणि सहा मुले यांच्या समवेत बेंगलोर येथे आले. तेथून निघून ते १९५४ पर्यंत दिल्लीपासून १६७ कि.मी. अंतरावरील उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थायिक झाले. हुकुमत राय वढेरांनी Mysore Electroplating या नावाने सुरू केलेला व्यवसाय ८० च्या दशकाच्या मध्यापर्यंत व्यवस्थित चालू होता आणि त्यातून त्यांना पुरेशी प्राप्ती होत होती. (संदर्भ :http://www.outlookindia.com/article.aspx?202854 आणि http://www.sundaytimes.lk/970302/plus2.html ).
मध्यंतरीच्या काळात राजींदर वढेरांनी नवी दिल्लीत
पण त्यानंतर व्यवसायास उतरती कळा लागली .१९८८ मध्ये कौटूंबीक व्यवसायाच्या वाटण्या झाल्या नंतर
हुकुमत राय वढेरा हे हॅरी हे टोपणनाव देखील वापरत. काहींच्या मते हे नाव त्यांची सून मौरीन यांनी त्यांना दिले, तर काहींच्या मते आयात-निर्यातीच्या व्यापारात संभाषणाकरता सुलभ म्हणून त्यांनी हॅरी हे नाव आणि त्यांचे एक सुपुत्र राजिंदर यांनी एरिक हे नाव धारण केले.
एच. आर. वढेरांचे आंतरधर्मीय घराणे
संपादनएच. आर. वढेरांना ओमप्रकाश वढेरा आणि राजिंदर वढेरा अशी दोन अपत्ये. यातील ओमप्रकाश वढेरांनी आपली काही स्थावर संपत्ती आपल्या मुलांच्या स्मरणार्थ एका रा.स्व.संघ प्रणीत शाळेस दान केली, पण ही शाळा संघ चालवतो हे आपणास माहीत नव्हते असे नंतरच्या काळात सांगितले.
राजिंदर उर्फ एरिक वढेरा यांचा विवाह रोम कॅथॉलिक असलेल्या मौरीन या स्कॉटिश स्त्रीशी झाला. त्यांना तीन अपत्ये झाली. त्यांनी आपल्या मुलांना बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन केले. या दोघांचे सर्वात मोठे सुपुत्र रिचर्ड यांचा विवाह सायरा यांच्याशी झाला. सायराची आई रोमन कॅथॉलिक आणि वडील मुस्लिम. या दोघांचे दुसरे पुत्र रॉबर्ट यांचा विवाह प्रियांका गांधी यांच्याशी झाला . फिरोझ गांधी यांच्या घराण्यातील म्हणून प्रियांका गांधी पारशी, आजीकडून हिंदू, आईकडून ख्रिश्चन. त्यांचे लग्नही ख्रिश्चन घरात झाले. (संदर्भ :http://iipm-bestfaculty.blogspot.in/2010/01/robert-vadra-priyanka-vadras-husband.html)