लौंग लाच्ची (पंजाबी गीत)

लौंग लाच्ची (पंजाबी: ਲੌਂਗ ਲਾਚੀ) हे त्याच नावाच्या २०१८ च्या पंजाबी चित्रपटातील एक गीत आहे, जे मन्नत नूरने गायले होते. गाण्यात मुख्य कलाकार एमी विर्क आणि नीरू बाजवा आहेत. हे गीत गुरमीत सिंग यांनी संगीतबद्ध केले तर हरमनजीतने लिहिले.

"लौंग लाच्ची"
चित्रपट गीत by मन्नत नूर
from the album लौंग लाच्ची (२०१८)
भाषा पंजाबी
इंग्रजी नाव Laung Laachi
Released २०१८
रेकॉर्ड केले २०१८
Studio टी-सीरीझ
गाण्याची शैली चित्रपट गीत
रेकॉर्डिंग कंपनी टी-सीरीझ
Composer(s) गुरमीत सिंग
Lyricist(s) हरमनजीत

लौंग लाच्चीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. ते इतके गाजले की यूट्यूबवर एक अब्जवेळा पाहिले जाणारे हे पहिले भारतीय गाणे ठरले. इतकी मोठी उंची गाठणारा लाची हा पहिला भारतीय संगीत व्हिडिओ ठरला होता.[][]

दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत या गाण्याने अनेक विक्रम केले. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे, कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांच्या लुका छुप्पी (२०१९) चित्रपटात देखील ते पुन्हा तयार केले गेले. तू लॉन्ग मैं इलायची असे या गाण्याचे शीर्षक होते.[]

निर्मिती

संपादन

पंजाबी चित्रपट 'लाँग लाची'चे हे शिर्षकगीत आहे. हरमनजीत यांनी चित्रपटासाठी हे गीत लिहिले, ज्याला गुरमीत सिंग यांनी संगीतबद्ध केले आणि मन्नत नूरने गायले. २१ फेब्रुवारी २०१८ रोजी 'टी-सीरीज अपना पंजाबी' यूट्यूब चॅनलवर ते रिलीज झाले. तसेच चित्रपट ९ मार्च २०१८ रोजी प्रदर्शित झाला.[]

लोकप्रियता

संपादन

या लोकप्रिय गाण्यातला अभिनेत्री नीरू बाजवाचा डान्सही खूप लोकप्रिय झाला. लग्न-समारंभ किंवा कोणत्याही सेलिब्रेशनच्या निमित्ताने अनेकांनी गाण्यासारखे नाचत व्हिडीओ तयार केले. हे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.[]

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅनन यांच्या लुका छुप्पी (२०१९) चित्रपटात देखील ते पुन्हा तयार केले गेले. तू लॉन्ग मैं इलायची असे या गाण्याचे शीर्षक होते.

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Singh, Shalu (2019-12-21). "Laung Laachi first Indian song to get 1-billion YouTube views". www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-23 रोजी पाहिले.
  2. ^ "Laung Laachi song becomes 1st Indian song to hit 1 billion on YouTube Ammy Virk, Neeru Bajwa | 'लौंग लाची' गाने ने YouTube पर रच दिया इतिहास, व्यूज के मामले में बनाया नया रिकॉर्ड | Hindi News, बॉलीवुड". zeenews.india.com. 2022-01-23 रोजी पाहिले.
  3. ^ Patil, Kashmira. "Mannat Noors Laung Laachi becomes the first Indian song to hit 1 Billion views on Youtube". Republic World (इंग्रजी भाषेत). 2022-01-23 रोजी पाहिले.
  4. ^ "VIDEO: 'लौंग लाची' गाने पर क्यूट बच्ची का डांस वायरल, फिल्म एक्ट्रेस ने किया शेयर". Zee News (हिंदी भाषेत). 2022-01-23 रोजी पाहिले.