मुंबईच्या दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राने २०१४ सालापासून महाराष्ट्र राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी अहमदनगर-औरंगाबाद-ठाणे-नागपूर-नाशिक-पुणे-मुंबई अशी एकूण आठ केंद्रे आहेत. ही स्पर्धा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिली फेरी ३० नोव्हेंबर २०१४ला झाली. अंतिम फेरी मुंबईत २० डिसेंबर २०१४ला आहे.

पारितोषिके संपादन

  • सर्वोत्कृष्ट एकांकिका : प्रथम क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका -द्वितीय क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट एकांकिका - तृतीय क्रमांक - रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता (३) - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (३)- रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट लेखक - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट संगीत - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र
  • सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - रोख पारितोषिक आणि सन्मानपत्र

एकूण सर्व ५० विजेत्यांना स्मृतिचिन्हे आणि भरघोस रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.


अंतिम स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या पुणे केंद्राच्या एकांकिका व त्या सादर करीत असलेली कॉलेजे संपादन

  • अंतर-डिसकनेक्ट (एम्‌‍आय्‌‍टी-महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे)
  • एका अंताची सुरुवात (शारदाबाई पवार महाविद्यालय, बारामती)
  • चिठ्ठी (पुण्याचे विधी महाविद्यालय)
  • चीनची भिंत (सिंहगड सायन्स कॉलेज)
  • बाऊंड्रीच्या पलीकडे (के‌ई‍एस इन्स्टिट्यूट, इस्लामपूर)
  • फोटू (मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे)
  • मोटिव्ह (मॉडर्न कॉलेज, पुणे)
  • रुह हमारी (गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे)
  • विल ऑफ द विशेस (स.प. महाविद्यालय, पुणे)