लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा (भारत)

(लोकसंख्येनुसार शहराचा दर्जा या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतामध्ये विशिष्ट लोकसंख्येवरून त्या वस्तीला खेडेगाव, गाव किंवा शहर संबोधले जाते.

  • ज्या गावाची लोकसंख्या ५,००० पेक्षा कमी असेल तर त्याला ‘खेडेगाव’ म्हणतात.
  • ज्या गावाची लोकसंख्या ५,००० ते १,००,००० दरम्यान असेल त्याला ‘गाव’ (Town) म्हणतात.
  • ज्या गावाची वस्ती १,००,००० (एक लाख) किंवा त्याहून अधिक असेत तर त्याला ‘शहर’ म्हणतात.

सेन्सस टाऊन

संपादन

ज्या गावाची लोकसंख्या किमान ५,००० असून त्यातील ७५ टक्के पुरुष शेतीवर अवलंबून नाहीत आणि ज्या गावाच्या लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ४००हून अधिक आहे, अशा गावाला ‘सेन्सस टाऊन’ (CT) म्हणतात.

स्टॅट्युटरी टाऊन

संपादन

ज्या गावात नगरपालिका, महापालिका, कॅन्टॉन्मेन्ट बोर्ड किंवा अशीच एखादी स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्या गावाला स्टॅट्युटरी टाऊन म्हणावे.

गावांचे वर्गीकरण

संपादन

वर्ग I : लोकवस्ती एक लाख किंवा त्याहून अधिक
वर्ग II : लोकवस्ती ५०,००० ते ९९,९९९
वर्ग III : लोकवस्ती २०,००० ते ४९,९९९
वर्ग IV : लोकवस्ती १०,००० ते १९,९९९
वर्ग V : लोकवस्ती ५,००० ते ९,९९९.

हे सुद्धा पहा

संपादन