लोकटाक सरोवर
ईशान्य भारतातील तलाव
लोकटाक हे भारताच्या मणिपूर राज्यातील एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. मणिपूरच्या दक्षिण भागात इम्फालच्या ४० किमी दक्षिणेस स्थित असलेले हे सरोवर भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. ह्या सरोवराचे वैशिठ्य म्हणजे येथील तरंगती बेटे. अशाच एका ४० चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या तरंगत्या बेटावर असलेले येथील कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान हे जगातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान आहे. संगई नावाचे दुर्मिळ हरीण केवळ येथेच सापडते.
लोकटाक सरोवर स | |
---|---|
स्थान | मणिपूर |
गुणक: 24°33′N 93°47′E / 24.550°N 93.783°E | |
प्रमुख अंतर्वाह | मणिपूर नदी व इतर |
प्रमुख बहिर्वाह | पाणी पुरवठा, जलविद्युत |
भोवतालचे देश | भारत |
कमाल लांबी | ३५ किमी (२२ मैल) |
कमाल रुंदी | १३ किमी (८.१ मैल) |
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ | ९८० चौ. किमी (३८० चौ. मैल) |
सरासरी खोली | २.७ मी (८ फूट १० इंच) |
कमाल खोली | ४.६ मी (१५ फूट) |
उंची | ७६८ मी (२,५२० फूट) |
लोकटाक सरोवराचा वापर मासेमारीसाठी तसेच जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. सरोवराच्या भोवताली सुमारे ५५ लहानमोठी गावे वसली आहेत ज्यांची एकत्रित लोकसंख्या सुमारे १ लाख आहे. हे आंतरराष्ट्रीय पाणथळ प्रदेश