लेलँड स्टॅनफर्ड

(लेलॅंड स्टॅनफर्ड, जुनियर या पानावरून पुनर्निर्देशित)

अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.

हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[][][][][]

स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Tuterow, Norman E. The governor: the life and legacy of Leland Stanford, a California colossus, Volume 2. (2004: Arthur H. Clark Co.2004) page 1146.
  2. ^ Carlisle, Rodney P. (editor). Handbook to Life in America, Vol. 4. (April 2009: Facts on File) page 8.
  3. ^ Cummings, Bruce. "Dominion from Sea to Sea: Pacific Ascendancy and American Power." (2009: Yale University Press.) page 672.
  4. ^ Lindsay, David. Madness in the Making. (2005: Universe.) page 214.
  5. ^ Goethals, George R. et al. Encyclopedia of Leadership, Vol. I. (2004: Sage Publications.) page 897.