लेलँड स्टॅनफर्ड
अमासा लेलँड स्टॅनफर्ड (९ मार्च, इ.स. १८२४:वॉटरव्हिलेट, न्यू यॉर्क, अमेरिका - २१ जून, इ.स. १८९३:पालो आल्टो, कॅलिफोर्निया अमेरिका) हा अमेरिकेतील उद्योगपती, राजकारणी आणि दानशूर होता. याने आपली पत्नी जॅनेट लेलँडसह स्टॅनफर्ड विद्यापीठाची स्थापना केली.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/3e/Leland_Stanford_c1870s.jpg/220px-Leland_Stanford_c1870s.jpg)
हा सदर्न पॅसिफिक रेलरोड आणि सेंट्रल पॅसिफिक या रेल्वे कंपन्यांचा मालक होता. अनेकांच्या मते अमेरिकेतील रॉबर बॅरनांपैकी हा एक होता.[१][२][३][४][५]
स्टॅनफर्ड कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर तसेच अमेरिकेच्या सेनेटमध्ये कॅलिफोर्नियाचा सेनेटर होता.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Tuterow, Norman E. The governor: the life and legacy of Leland Stanford, a California colossus, Volume 2. (2004: Arthur H. Clark Co.2004) page 1146.
- ^ Carlisle, Rodney P. (editor). Handbook to Life in America, Vol. 4. (April 2009: Facts on File) page 8.
- ^ Cummings, Bruce. "Dominion from Sea to Sea: Pacific Ascendancy and American Power." (2009: Yale University Press.) page 672.
- ^ Lindsay, David. Madness in the Making. (2005: Universe.) page 214.
- ^ Goethals, George R. et al. Encyclopedia of Leadership, Vol. I. (2004: Sage Publications.) page 897.