लेंड लीझ
लेंड लीझ तथा लेंड लीझ अॅक्ट हा अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेला कायदा होता. ११ मार्च, १९४१ रोजी अमलात आलेल्या या कायद्यातहत अमेरिकेने युनायटेड किंग्डम, सोवियेत संघ आणि इतर दोस्त राष्ट्रांना अन्न, खनिज तेल आणि युद्धसामग्रीचा पुरवठा केला. ही मदत एकूण ५०.१ अब्ज अमेरिकन डॉलर (२०२० चे ६९० अब्ज डॉलर किंवा ५६,५८० अब्ज रुपये) इतकी होती. अमेरिकेने युद्धावर केलेल्या खर्चाचा हा १/६ भाग होता.
लेंड लीझ कायद्यात ही मदत परत करण्याची अट असली तरीही प्रत्यक्षात हे दानच होते. युद्धानंतर तुरळक प्रमाणात परत केलेली युद्धसामग्री सोडता ही मदत अमेरिकेने सोडून दिली.