लॅटियम हे एक प्राचीन राज्य होते. हल्लीच्या रोम शहराजवळ या राज्याचा विस्तार होता. सातव्या शतकाच्या अखेरीपर्यंत लॅटियम हे एक प्रमुख राज्य होते. लॅटिन भाषेचा उगम लॅटियममध्येच झाला होता. रोम हे प्राचीन काळी लॅटियममधील एक लहान गाव होते.