लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ
लुई आर्मस्ट्राँग न्यू ऑर्लिअन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MSY, आप्रविको: KMSY, एफ.ए.ए. स्थळसूचक: MSY) अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिअन्स शहराचा विमानतळ आहे. याला जॅझ संगीतकार लुई आर्मस्ट्राँगचे नाव देण्यात आलेले आहे.
येथून अमेरिकेतील बव्हंश मोठ्या शहरांना तसेच कॅनडा, मेक्सिको व मध्य अमेरिकेतील निवडक शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून स्पिरिट एरलाइन्स, साउथवेस्ट एरलाइन्स आणि डेल्टा एरलाइन्स मोठ्या प्रमाणात प्रवाशांची ने-आण करतात.