ली आयकोका

अमेरिकन उद्योगपती

ली आयकोका (१५ ऑक्टोबर १९२४ - २ जुलै २०१९ ) हे अमेरीकेतील उद्योगपती होते. ते फोर्ड मोटर कंपनीक्रायस्लर या दोन वाहन कंपन्यांचे अध्यक्ष होते. अभियांत्रिकी पदवी घेतल्यानंतर १९४६ साली ते फोर्ड मोटर कंपनीत विक्री विभागात रुजु झाले. त्या नंतर १९७० सली स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी कंपनितील सवोच्च पदी म्हणजे कंपनीचे अध्यक्ष होण्यापर्यंत मजल मारली. मस्टॅग व फोर्ड पिंटो या फोर्ड मोटर कंपनीना यशाच्या शिखरावर नेणरया गाड्याची निर्मिती त्यांनी केली. मिस्टर मस्टॅग या नावाने ख्याती लाभलेल्या ली आयकोका यांची फोर्ड कंपनीतून १९७८ साली अगदी अचानक हकालपट्टी करण्यात आली. ते १९७८ साली दिवाळखोरीच्या कडेलोटावर उभी असलेल्या क्राईस्लर कॉर्पोरेशन या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्यांनी कंपनी वाचवायच्या प्रयत्नांना सुरुवात केली. ते अमेरीकन सरकारकडुन भले मोठे कर्ज ( 'फेडरल लोन' ) मिळवण्यात यशस्वी झाले व अभिजातता व व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर क्रायस्लर मोटार कंपनीला आर्थिक दुरवस्थेतून बाहेर काढण्यात ते यशस्वी झाले. यांनी अमेरीकन सरकारकडुन घेतलेले कर्ज मुदतिच्या बरेच आधी फेडुन एक इतीहास निर्माण केला. यांच्या या प्रयत्नात 'क्रायस्लर' ही जगातील जनरल मोटर्स व फोर्ड नंतरची त्या काळातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी वाहन कंपनी बनली.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "ग्रेट आयडियाज् : 'व्यवस्थापन म्हणजे इतरांना प्रेरित करणं..'-ली आयकोका". 2016-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-22 रोजी पाहिले.