लीला अर्जुनवाडकर
डॉ. लीला कृष्ण अर्जुनवाडकर, पूर्वाश्रमीच्या कु. लीला देव ( १० जून १९३२ (पंढरपूर) - ०५ एप्रिल २०२२ (पुणे) ), या पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली आणि अर्धमागधी यांचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यापिका होत्या. कै. कृ.श्री. अर्जुनवाडकर यांच्या या पत्नी. डॉ. मिहिर अर्जुनवाडकर हे त्यांचे सुपुत्र.
शिक्षण
संपादन- १९४८, मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक (शाळा हुजूरपागा-पुणे)
- १९५०, इंटर आर्ट्स, स.प.महाविद्यालय-पुणे. लोकमान्य टिळक संस्कृत शिष्यवृत्ती
- १९५२, बी.ए., पुणे विद्यापीठ (कॉलेज-स.प.महाविद्यालय-पुणे). विषय संस्कृत-मराठी. प्रा. करमरकर पारितोषिक
- १९५४, एम.ए.(प्रथम श्रेणी, प्रथम क्रमांक), पुणे विद्यापीठ. विषय संस्कृत-पाली. विश्वनाथ-पार्वती गोखले पारितोषिक
- १९५४-५६, पीएच.डी. त्यासाठी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती
अध्यापनकार्य
संपादन- इ.स. १९५६ते १९९२ पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत, पाली, अर्धमागधी या विषयांचे अध्यापन
- पुणे विद्यापीठात एम.ए.च्या वर्गाला १० वर्षे पाली विषय शिकविला.
भूषविलेली पदे
संपादन- इ.स.१९७३पासून पुण्याच्या स.प. महाविद्यालयात संस्कृत विभाग-प्रमुख
- १९८०-८३ ग्रंथालय प्रमुख
- त्याच कॉलेजात सुमारे २५ वर्षे संस्कृत संघटनाप्रमुख. या काळात अनेक नामवंतांच्या व्याख्यानांचे आणि संस्कृतसंबंधी अन्य कार्यक्रमांचे संयोजन
- पुणे विद्यापीठातील संस्कृत अभ्यास मंडळाच्या सभासद
संपादन
संपादन- १९८०-८३ : स.प. महाविद्यालयाच्या Library News Letterचे संपादन
- ’गीतादर्शन’ या गीताचर्चासत्रावरील आधारित ग्रंथाचे संपादन
उपक्रम
संपादन- संगीत साहित्य, अभिनय, यांच्याशी संबंधित परिसंवाद, मुलाखती आदी कार्यक्रमांत सहभाग.
गौरवगंथ
संपादनप्रा. लीला अर्जुनवाडकर यांच्या ७७व्या जन्मदिनी त्यांच्या निवडक लेखांचा ’लीलाकमलपत्राणि’ नावाचा गौरवग्रंथ त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी अर्पण केला.
- प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या नाटकांमधून भूमिका
- आकाशवाणीवर ४०-४५ वर्षे दिलेली भाषणे
- आकाशवाणीवर संस्कृत श्रुतिका सादर करणे
- संस्कृत नाट्यस्पर्धांत परीक्षक म्हणून काम
- भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, आदी संस्थांच्या नियामकमंडळावर काम
- ज्ञानप्रबोधिनी या शाळेत संस्कृत वाचनवर्ग चालविणे
- भरताच्या नाट्यशास्त्रावर अभ्यासवर्ग चालवणे
- चर्चासत्रांत आणि सार्वजनिक सभांत दिलेली मराठी भाषणे (सुमारे ४०), वगैरे, वगैरे.
लेखन
संपादन- डॉ. लीला अर्जुनवाडकर यांनी लिहिलेली कृ.श्री. अर्जुनवाडकर, भालबा केळकर, पं. महादेवशास्त्री जोशी, डॉ. रा.चिं. ढेरे, डॉ. रा.ना. दांडेकर, डॉ. अप्पासाहेब पेंडसे, द.श्री. बापट, रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे, अरविंद मंगरूळकर, पु.शि. रेगे, डॉ. श्रीराम लागू, प्राचार्य न.गो. सुरू, आदी अनेक प्रसिद्ध व्यक्तींची व्यक्तिचित्रणे मराठी नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाली आहेत.
- त्याशिवाय लीला अर्जुनवाडकरांचे संस्कृत वाङ्मयावर, भाषाशास्त्रावर, आणि अध्यापनावर लिहिलेले ५०हून अधिक ललित लेख नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत.
- इतरांनी लिहिलेल्या पुस्तकांची परीक्षणे ; सुमारे १२.
- ऐन्धनेयब्राह्मणम् - गॅसायनम् हा शारदा मासिकात लिहिलेला विनोदी संस्कृत लेख.
- रक्षत संस्कृतम् हा वैचारिक लेख
- संस्कृत वाङ्मय आणि संगीत आदी विषयांवरील अनेक इंग्रजी लेख