लिओ पहिला

(लिओ पहिला, बायझेन्टाईन या पानावरून पुनर्निर्देशित)

सीझर फ्लाव्हियस व्हॅलेरियस लिओ ऑगस्टस (इ.स. ४०१ - जानेवारी १८, इ.स. ४७४) हा इ.स. फेब्रुवारी ७, इ.स. ४५७ ते मृत्युपर्यंत बायझेन्टाईन सम्राटपदी होता. बायझेन्टाईन सेनापती ऍस्पारने बसवलेल्या सम्राटांपैकी हा शेवटचा होय.

लिओच्या राज्यकालात बाल्कन प्रदेशात हूणवेस्ट गॉथ यांच्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला होता. परंतु त्यांना कॉन्स्टेन्टिनोपल घेता आले नाही. लिओचा रोमन राजकारणात प्रभाव होता. त्याने रोमन सम्राटपदी ऍन्थेमियसच्या केलेल्या नेमणुकीतुन हे दिसुन येते. लिओने आपली मुलगी इसॉरियन राजा तारासिकॉडिसाला दिली व त्याजोगे ऍस्पारला बायझेन्टाईन राजकारणातून दुर केले.

वयाच्या ७२व्या वर्षी लिओ अतिसाराने मृत्यु पावला.

मागील:
मार्सियन
बायझेन्टाईन सम्राट
फेब्रुवारी ७, इ.स. ४५७जानेवारी १८, इ.स. ४७४
पुढील:
लिओ दुसरा