लिंकिन पार्क अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याच्या अगॉरा हिल्स शहरात स्थित रॉक संगीतसमूह आहे. १९९६ साली स्थापन झालेल्या ह्या बँडने ६ कोटींपेक्षा जास्त अल्बम्स विकले आहेत आणि दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचा पहली अल्बम, हायब्रिड थिअरी पासूनच त्यांना मुख्यप्रवाहात यश मिळाले. त्याला २००५ साली आर.आय.ए.ए. (RIAA) द्वारा हीरक म्हणून प्रमाणित केले गेले. ह्यानंतरच्या स्टुडिओ अल्बम मिटिओरा ने बँडचे यश कायम राखले. २००३ सालच्या बिलबोर्ड २०० अल्बम चार्टमध्ये हा अल्बम प्रथम स्थानी होता. बँडच्या जगभरातील व्यापक दौऱ्यांमुळे आणि सेवाभावी प्रदर्शनांमुळे ते पुढे गेले. २००३ साली एमटीव्ही२ ने लिंकिन पार्कला म्युझिक व्हिडिओ युगाच्या सहाव्या स्थानी सर्वाधिक महान आणि ओएसिस आणि कोल्डप्लेनंतर, नव्या शतकाच्या सर्वश्रेष्ठ तिसऱ्या स्थानी नामित केले. हाइब्रिड थिअरी आणि मिटिओरामध्ये नु मेटल आणि रॅप रॉक शैलींना रेडिओसाठी अनुकूल, पण सघन-स्तरित शैलीत अंगिकारल्यानंतर बँडने त्यांच्या पुढील स्टुडियो अल्बम मिनट्स टू मिडनाइट मध्ये इतर शैलींवर प्रयोग सुरू केले. अल्बम बिलबोर्ड चार्टमध्ये सर्वांत वर होता व त्यावर्षीच्या इतर सर्व अल्बमपैकी तीसरा सर्वश्रेष्ठ सप्ताह ठरला. त्यांचा नवा अल्बम अ थाउझंड सन्स ८ सप्टेंबर २०१० साली रिलीझ झाला. त्यांनी अनेक इतर कलाकारांसोबत मिळून, विशेषतः रैपर जे-झी सोबत, त्यांचा मॅशअप एल्बम कोलिशन कोर्स और अनेक इतर कलाकारांसोबत रीअ‍ॅनिमेशन वर काम केले. ह्या जगातील सहस्राब्दि नंतर बनलेल्या अशा संगीत रचना आहेत, ज्यांच्या जगभरात ५ कोटीपेक्षा जास्त रेकॉर्ड्सची विक्री झाली आहे.

बँडचा इतिहास

संपादन

प्रारंभिक वर्ष (१९९६-२०००)

संपादन

मूळतः माइक शिनोडा, ब्रेड डेल्सन आणि रोब बोर्डन या तीन शाळेय मित्रानी लिन्किन पार्कचा पाया रचला आणि मजबूत केला. हाई स्कुलची उपाधी ग्रहन केल्यानंतर, या कैलिफ़ोर्नियाच्या मुलांनी त्यांच्या संगीतरूचिला गांभिर्याने घेन्यास सुरुवात केली आणि जो हैन, डेव "फीनिक्स" फ़ैरेल आणि मार्क वेकफ़ील्ड यांना बैंड जीरोमधे संमिलित केले. अपुरे संसाधन असतानासुद्धा, १९९६ मधे माईक शिनोडाच्या कामचलाऊ बेडरूम गाण्यांना घेऊन बैंडने रेकौर्डींग आणि निर्माण सुरू केले. रिकौर्डचा करार विफळ झाल्यानंतर बैंडमधे तनाव आणि निराशा भोभावू लागली. यशाचा अभाव आणि प्रगतिपथावरिल संथपना या कारणांनी गतकाळील गायक वेकफ़िल्डला बैंड सोडून अन्य परियोजना शोधण्यास प्रव्रुत्त केले. फ़ैरेलने सुद्धा बैंड सोडला आणि टेस्टी स्नैक्स आणि इतर बैंड्च्या दौऱ्यावर निघुन गेला. वेकफ़िल्ड्च्या स्थानापन्नच्या शोधात फ़ार वेळ घातल्यानंतर, जीरोने चेस्टर बेनिंगटन या एरिजोनाच्या गायकाला भर्ती केले ज्याला जोंबा संगिताचे उपाध्यक्ष जेफ ब्लू याने मार्च १९९९ला बैंड मधे पाठविले होते. बेनिंगटन, जो कि याआधि ग्रे डेज मधे होता, त्याच्या वेगळ्या गायनशैलीमुळे आवेदकांम्धे जमून बसला. बैंडचे नाव जीरो बदलवून हायब्रिड थेअरी ठेवले गेले. शिनोडा आणि बेनिंगटन मधिल नवजात ताळमेळाने बैंडला पुनःजिवित करण्यास मदद केली; आणि बैंडला नवनव्या सामग्रीवर काम करण्यास प्रव्रूत्त केले. नंतर बैंडचे नाव हायब्रिड थिअरीचे बदलून लिंकिन पार्क झाले, जे कि एका नाटकाशी जुळ्लेले होते आणि सांता मोनिकाच्या लिंकन पार्कला खंडणी स्वरूप होते. तथापि, यासगळ्या परिवर्तनानंतर, बैंडला रिकार्ड पक्के करण्यासाथी फ़ार संघर्ष करावे लागले. खुप काही रिकार्ड लेबल पासून अस्विस्क्रुती मीळाल्यानंतर लिंकिन पार्क अतिरिक्त मदतीसाठी जेफ़ ब्लू कळे वळ्ला. जेफ़ ब्लू जो आज वार्नर ब्रद्रर्स रिकार्ड्चा उपध्यक्ष आहे, १९९९ मधे बैंडला कंपनीसोबत करार करण्यास मदत केली. त्यानंतर लगेच बैंडने पुढल्या वर्षी यशस्वी अल्बम ’हायब्रिड थिअरी’ प्रकाशित केला.

हायब्रिड थिअरी (२०००-२००२)

संपादन

लिंकिन पार्कने २४ ऑक्टोबर, २००० रोजी हायब्रिड थिअरी प्रकाशित केला; जो बैंडच्या अर्ध्या दशकाचे काम दर्शवतो, संगित निर्माता डॉन गिलमोर द्वारा संपादित. संगितप्रेमिंना हायब्रिड थिअरी अल्बम फ़ार आवडला आणि बैंडने पहिल्या वर्षातच ४.८ मिलियन पेक्षा अधिक रिकार्ड विकले; ज्याने त्याला २००१ मधे सर्वात अधिक विकलेल्या अल्बमचा दर्जा प्राप्त झाला. जेव्हा कि ’क्रॉलिंग’ आणि ’वन स्टेप क्लोजर’ सारख्या एकल ने तत्कालिन ऑल्टर्नेटिव्ह रॉक रेडिओ प्ले-लिस्ट मधे स्वतःला स्टेपल म्हणून प्रस्थापित केले. ह्याच्या अतिरिक्त अल्बमचे काही एकल, ड्रेकुला २०००, लिटिल निक्की आणि वैलेनटाईन सारख्या चित्रपटात घेतले गेले. हायब्रिड थीअरीचे तीन ग्रेमी पुरस्कारांसाठी नामांकन झाले, ज्यामधे सर्वोत्तम रॉक अल्बम, सर्वोत्तम कलाकार आणि सर्वोत्तम हार्ड रॉक (क्रॉलिंग करिता) समाविष्ट आहे. एमटीवी ने बैंडला "इंन दी एंड" साठी सर्वश्रेष्ठ रॉक विडिओ आणि सर्वश्रेष्ठ निर्देशन करिता संमानित केले. सर्वोत्तम हार्ड रॉक प्रदर्शनाकरिता हायब्रिड थिअरीने ग्रेमी जिंकला आणि या समस्त सफ़लतेने बैंडला मुखधारामधे शिखरावर पोहोचवले.