चुलीमध्ये जी लाकडे घातली जातात त्याला फाटा असे म्हणतात. लाकूड-फाटा असा शब्द जास्त प्रचलित आहे. यास सरपण असेही म्हणतात. उन्हाळ्यात चुलीसाठीचे जळण गोळा करण्याच्या क्रियेलाही 'बाई फाट्याला गेली आहे' असे संबोधण्याची पद्धत आहे. मोठी लाकडे आणून चुलीच्या मापाची कुऱ्हाडीने घरीच उभी चिरली (लाकुड घेऱ्यात कमी केले) तरी त्यास फाटा केला असे म्हणायाची गावाकडे पद्धत आहे.

लाकूड-फाटा