लघुत्रयी
लघुत्रयी हे आयुर्वेदावरचे शार्ङ्गधरसंहिता, भावप्रकाश आणि योगरत्नाकर या तीन ग्रंथत्रयीला दिलेले नाव आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय ह्या बृहद्त्रयींमध्ये येणाऱ्या तीन ग्रंथांपाठोपाठ लघुत्रयींमधले ग्रंथ येतात.
शार्ङ्गधरसंहितेचा कर्ता शार्ङ्गधर, भावप्रकाशचा भावमिश्र आणि योगरत्नाकराचा योगरत्नाकर होते. हे ग्रंथ अनुक्रमे इ.स. १४४१, इ.स. १५५० आणि इ.स. १५९४ साली रचले गेले.