"लग जा गले" हे हिंदी गीत आहे जे राजा मेहदी अली खान यांनी लिहले होते, तर संगीत मदन मोहन कोहलींनी दिले होते. १९६४ च्या "वो कौन थी?" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.[] पडद्यावर हे गाणे चित्रपटाची नायिका असलेल्या साधनाने सादर केले होते, तर लता मंगेशकर यांनी गायले होते.[]

मदन मोहन यांनी संगीत दिले होते
"लग जा गले"
चित्रपट गीत by लता मंगेशकर
from the album वो कौन थी?
भाषा हिंदी
Released १९६४
रेकॉर्डिंग कंपनी सारेगामा
Composer(s) मदन मोहन
Lyricist(s) राजा मेहदी अली खान
निर्माते सारेगामा

तमिळ, तेलुगू आणि बंगालीसारख्या अनेक भाषांमध्ये या गाण्याचा आवृत्त्या निघाल्या आहेत.[][] तसेच हिंदीमध्ये आजपर्यंत बऱ्याच वेळा विविध चित्रपटांत या गाण्याच्या अनेक आवृत्त्या तयार केल्या गेल्या.[]

अभिनेत्री साधनाचे निधन झाल्यावर तिला या गाण्याची अभिनेत्री म्हणून संबोधून तिचे अनेकदा स्मरण केले गेले.[] अभिनेता इरफान खानचे २०२० मध्ये कर्करोगाने निधन झाले. तो त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे गाणे ऐकत असे.[]

भारतीय संगीत परंपरेत

संपादन

राग पहारीमध्ये संगीत दिले आहे. हे गाणे दादरा गाण्याचे उदाहरण आहे.

१९६४ पासून "लग जा गले"

संपादन

लता मंगेशकर यांची संगीतक्षेत्रातील कारकीर्द ७० वर्षांहून अधिक काळाची होती. यात त्यांची हजारो गाणी रेकॉर्ड केली गेली. इतर मोजक्या गाण्यांबरोबर या प्रतिष्ठित गाण्यासाठी लता मंगेशकर यांना ओळखले जाते. लता यांनी स्वतः हे गाणे २०१६ मधील त्यांच्या शीर्ष सहा आवडत्या गाण्यांपैकी[] आणि २०१२ मधील त्यांच्या आवडत्या २० गाण्यांपैकी एक मानले होते.[]

२०१४ मध्ये, गाण्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ट्विट केले:[१०]

"Namaskar Is varsh 'Lag ja gale ke phir ye hasee'n raat' is geet ko 50 saal pure ho rahe hain. aisa madhur geet aaj bhi purana nahi lagta"

( "या वर्षी 'लग जा गले के फिर ये हसीन रात' ह्या गाण्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. पण यासारखी मधुर गाणी कधीच जुनी वाटत नाहीत.")

गायक अमित मिश्रा म्हणतो की, "माझे लताजींचे हे आवडते गाणे 'लग जा गले' आहे आणि मी ते रिपीट मोडवर लाखो वेळा ऐकू शकतो."[११]

गाण्याचे शब्द

संपादन
 
"गले लगना" (मिठी मारणे)

या गाण्यात गायिका व्यक्त करते की आज संध्याकाळी ती तिच्या प्रियकराला शेवटची भेट देईल.

"गले लगना" प्रेमाने मिठी मारणे किंवा आलिंगन देणे. हे गाणे येऊ घातलेल्या ताटातूटीबद्दल तीव्र दुःख व्यक्त करते, जे कदाचित अखेरचे वेगळे होणे आहे. "होना हो" या हिंदी शब्दाचा अर्थ भविष्यात घडू शकतो किंवा होणार नाही. हिंदू धर्मात, मृत्यू हा या जीवनाचा वियोग आहे. विभक्त होणे, जरी चित्रपटात दोन प्रेमिकांचे विभक्त होणे व्यक्त केले असले तरी, भारतीय संदर्भात मृत्यू देखील होऊ शकतो.

काही व्यक्तींनी हे गाणे मरणासन्न आजींसाठी गायल्याचे आठवते. कर्करोगामुळे मृत्यू ओढवलेल्या जवळच्या माणसाने या गाण्यावर शेवटचा नाच केला असल्याच्या अत्यंत भावुक आठवणी जवळचे नातेवाईक सांगतात. हे गाणे कधीकधी भारतीय अंत्यसंस्कारात गायले जाते. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले एक आयकॉनिक गाणे मानले जाते.[१२]

खाली गाण्याचे देवनागरी (हिंदी), नस्तालिक (उर्दू) आणि इंग्रजीमध्ये शब्द दिले आहेत:

  • हिंदी

लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

हमको मिली हैं आज ये घड़ियाँ नसीब से

जी भर के देख लीजिये हमको करीब से

फिर आपके नसीब में ये बात हो न हो

पास आइये कि हम नहीं आएंगे बार-बार

बाहें गले में डाल के हम रो लें ज़ार-ज़ार

आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो

शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो

  • उर्दू

لگ جا گلے کہ پھر یہ حسیں رات ہو نہ ہو

شاید پھر اس جنم میں ملاقات ہو نہ ہو

ہم کو ملی ہیں آج یہ گھڑیاں نصیب سے

جی بھر کے دیکھ لیجیئے ہم کو قریب سے

پھر آپ کے نصیب میں یہ بات ہو نہ ہو

پاس آئیے کہ ہم نہیں آئیں گے بار بار

باہیں گلے میں ڈال کے ہم رو لیں زار زار

آنکھوں سے پھر یہ پیار کی برسات ہو نہ ہو

شاید پھر اس جنم میں ملاقات ہو نہ ہو

  • इंग्रजी

Lag jaa gale ke phir yeh haseen raath ho na ho

Shaayad phir is janam mey mulaaqaat ho na ho

Hum ko mile hai aaj yeh ghadiyaan naseeb se

Jee bhar ke dekh leejiye hum ko qareeb se

Phir aap ke naseeb mey yeh baat ho na ho

Paas aayie ke hum nahin aayenge baar baar

Baahein gale mein daal ke hum ro le zaar zaar

Aankon se phir yeh pyaar ki barsaath ho na ho

Lag jaa gale ke phir yeh haseen raath ho na ho

  • इंग्रजी

Embrace me, for this beautiful evening may not come again

Perhaps we may never meet again in this life

Fate has given us these few moments

You can look at me from up close, as much as you wish

Your fate may never have this opportunity again

Come closer, I will not return again and again

Let me wrap my arms around your neck and cry for a long time

My eyes may never shed such a shower of love again

Embrace me, for this beautiful evening may not come again

लोकप्रिय वाङ्मयात

संपादन

"वो कौन थी" या चित्रपटासाठी हे गाणे सुरुवातीला चित्रपट दिग्दर्शकाने नाकारले होते, असे म्हणले जाते. दुसऱ्यांदा ऐकल्यावर त्याने ते समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. पण यावेळी मदन मोहन तयार नव्हते. बऱ्याच विनंत्या आणि प्रयत्न करून हे गाणे चित्रपटात देण्यासाठी मदन मोहन यांना तयार केले गेले.[१३]

2015 मध्ये जेव्हा अभिनेत्री साधनाचे निधन झाले, तेव्हा तिला या गाण्याची अभिनेत्री म्हणून संबोधून तिचे अनेकदा स्मरण केले गेले.[१२]

अभिनेता इरफान खान, 29 एप्रिल 2020 रोजी कर्करोगाशी लढा देऊन मरण पावला. तो त्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये हे गाणे ऐकत असे.[]

नंतरच्या आवृत्त्या

संपादन

1966 मध्ये, दोन चित्रपटांमध्ये हे गाणे वापरले गेले: यार नी? या तामिळ चित्रपटात, ते "पोनमेनी थाझुवामल" असे भाषांतरित केले आहे, आणि तेलुगू चित्रपट आमे एवारू? त्याचे भाषांतर "आंदला ई रे" असे केले होते.

1968 मध्ये शिप्रा बोस यांनी त्याच गाण्याची बंगाली आवृत्ती सादर केली " शोंगी जे के ए मनके अमर आज डोलालो" हे गाणे मिल्टू घोष यांनी बंगालीमध्ये लिहिले होते.

गायिका श्रेया घोषालने 2010च्या दशकात अनेक वेळा मैफिलीत गाणे सादर केले.[१४]

सनम या बँडद्वारे त्याचे सादरीकरण इतके लोकप्रिय झाले आहे की काही तरुणांना असे वाटते की त्यांचेच हे मूळ गाणे आहे.[१५] 14 जून 2020 रोजी मरण पावलेल्या सुशांत सिंग राजपूत अभिनीत केदारनाथ चित्रपटात गायक सनम पुरी यांचे सादरीकरण आहे.

2018च्या साहेब, बीवी और गँगस्टर 3 मध्ये प्रदर्शित झालेल्या जोनिता गांधीने गायलेल्या गाण्याचे सादरीकर आहे.[]

हे पाकिस्तानमधील अनेक गायकांनी देखील गायले आहे.

संदर्भ

संपादन
  1. ^ Ramani, Priya (2019-05-17). "Opinion | Saregama, success and sad songs". mint (इंग्रजी भाषेत). 2022-01-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-03 रोजी पाहिले.
  2. ^ "yt".
  3. ^ Guy, Randor (2016-07-03). "Yaar Nee? (1966) TAMIL" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  4. ^ "Yt".
  5. ^ a b "IMDb".
  6. ^ "लग जा गले कि फिर ये हसीं रात हो ना हो". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2015-12-25. 2022-01-15 रोजी पाहिले.
  7. ^ a b "'Irrfan Khan listened to Lag jaa gale ki phir during his treatment, a reminder for us all': says cancer survivor Lisa Ray". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2020-04-29. 2022-01-15 रोजी पाहिले.
  8. ^ "Lata Mangeshkar birthday: The legendary singer lists her six favourite songs". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2016-09-28. 2022-01-15 रोजी पाहिले.
  9. ^ "Lata Mangeshkar first time chooses her favourite songs - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  10. ^ "English News Headlines: Latest News Today, Breaking News from India & World". Jagran English (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  11. ^ "World Music Day: Celebrating musical maestros of Bollywood". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2018-06-20. 2022-01-15 रोजी पाहिले.
  12. ^ a b "'लग जा गले कि फिर मुलाकात हो, न हो...'". BBC News हिंदी (हिंदी भाषेत). 2017-05-07. 2022-01-15 रोजी पाहिले.
  13. ^ "लग जा गले कि फिर ये हसीन रात हो ना हो… रिजेक्ट हो गया था गाना, डायरेक्टर ने दूसरी बार सुना तो करने लगा अफसोस". Jansatta (हिंदी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  14. ^ Tanna, Amrita (2018-05-02). "Shreya Ghoshal Week: Best live performances in UK". BizAsia | Media, Entertainment, Showbiz, Brit, Events and Music (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.
  15. ^ "It's funny when some teenagers think 'Lag Ja Gale' is not sung by Lata Mangeshkar but Sanam band: Isheta Sarckar". www.radioandmusic.com (इंग्रजी भाषेत). 2022-01-15 रोजी पाहिले.