उत्तर लखीमपूर
(लखीमपुर या पानावरून पुनर्निर्देशित)
उत्तर लखीमपूर (आसामी: উত্তৰ লখিমপুৰ) हे भारत देशाच्या आसाम राज्यातील लखीमपूर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. उत्तर लखीमपूर शहर आसामच्या उत्तर भागात गुवाहाटीच्या ३९४ किमी ईशान्येस वसले आहे. २०११ साली उत्तर लखीमपूरची लोकसंख्या ५९ हजार होती.
उत्तर लखीमपूर উত্তৰ লখিমপুৰ |
|
आसाममधील शहर | |
देश | भारत |
राज्य | आसाम |
जिल्हा | लखीमपूर जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | १५७ फूट (४८ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ५९,८१४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
लिलाबारी विमानतळ येथून ७ किमी अंतरावर स्थित आहे. उत्तर लखीमपूरला अरुणाचल प्रदेशचे प्रवेशद्वार मानले जाते.