लक्ष्मण पर्वतकर
लयभास्कर लक्ष्मण पर्वतकर तथा खाप्रुमामा इ.स. १८७९ - ३ सप्टेंबर, इ.स. १९५३[ दुजोरा हवा] हे एक तबलावादक होते. त्यांना १९३९ साली लयभास्कर ही पदवी देण्यात आली होती.
लक्ष्मण पर्वतकर (खाप्रुमामा) | |
---|---|
[[चित्र:|250px]] लक्ष्मण पर्वतकर | |
उपाख्य | खाप्रुमामा. घरगुती नांव - खाप्रु. |
आयुष्य | |
जन्म | इ.स. १८७९ (पर्वत,गोवा) |
मृत्यू | सप्टेंबर ३, इ.स. १९५३ |
गौरव | |
गौरव | * लयभास्कर
|
बालपण व शिक्षण
संपादनखाप्रुमामा यांचा जन्म १८७९ साली गोव्यातील 'पर्वत' नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले.
कारकीर्द
संपादनखाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरून त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते.[ संदर्भ हवा ]
१९१९ साली पं. विष्णू पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या लयकारीमुळे अनेक संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.[ संदर्भ हवा ]
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' ही पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' ही पदवी देण्यात आली.[ संदर्भ हवा ] त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे.[ संदर्भ हवा ]
वैशिष्ट्ये
संपादनलयीच्या ज्ञानामुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरून त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत.[ संदर्भ हवा ] उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरून समेवर आणणे त्यांना सहज जमत असे.[ संदर्भ हवा ]
त्यांनी अनेक नवीन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा).[ संदर्भ हवा ]
गौरव
संपादन- लयभास्कर
- तालकंठमणी
संदर्भ
संपादन- थोर संगीतकार - प्रा. देवधर
- लयभास्कर खाप्रुमामा पर्वतकर - गोपाळकृष्ण भोबे
- महाराष्ट्रात स्वामी विवेकानंद - स्वामी विदेहात्मानंद (रामकृष्ण मठ नागपूर)