लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (अधिकृतपणे: द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, ज्याला एलएसई असेही म्हणले जाते) हे लंडन, इंग्लंडमधील एक सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे आणि संघीय लंडन विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे.

द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स
द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा नावासह लोगो
ब्रीदवाक्य Rerum cognoscere causas (लॅटिन)
मराठीमध्ये अर्थ
"गोष्टींच्या कारणांना समजून घ्या"
Type सार्वजनिक संशोधन विद्यापीठ
स्थापना इ.स. १८९५
विद्यार्थी ११,२१० (२०१६/१७)
संकेतस्थळ http://www.lse.ac.uk/



१९०० मध्ये फेबियन सोसायटीचे सदस्य सिडनी वेब, बीट्राइस वेब, ग्रॅहम वाल्य, आणि जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्याद्वारे समाज हितासाठी स्थापना करण्यात आली . एलएसईने १९०० मध्ये लंडन विद्यापीठामध्ये प्रवेश केला व १९०१ मध्ये विद्यापीठाच्या तत्त्वावर त्यांचा पहिला पदवी अभ्यासक्रम सुरू केला. एलएसई ने २००८ पासून स्वतःची पदवी दिली आहे, जे त्यापूर्वी लंडन विद्यापीठाची पदवी बहाल केली होती.

लंडन स्कूल ऑफ इकॉनमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये शिक्षण घेतलेले भारतीय कमी आहेत. त्यापैकी काहींची नावे पुढिलप्रमाणे आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त व्ही. के. कृष्ण मेनन, माजी केंद्रीय मंत्री सी. आर पट्टाभिरामन्, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीपद प्रदीर्घ काळ भूषवलेले कॉ. ज्योती बसू , भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन्, नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन आणि जागतिक बँकेचे चीफइकॉनॉमिस्ट आणि उपाध्यक्ष कौशिक बसू. मात्र लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पोलिटिकल सायन्समध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा स्थापला गेला आहे. आणि तेथे पुतळा असणारे ते एकमेव भारतीय आहेत.[१]

संदर्भ संपादन

  1. ^ "डॉ. आंबेडकरांचे लंडन." Loksatta. 2015-11-08. 2018-04-01 रोजी पाहिले.